घरपालघरकांदळवन क्षेत्रात बेकायदेशीर पाईपलाईन टाकणे भोवले

कांदळवन क्षेत्रात बेकायदेशीर पाईपलाईन टाकणे भोवले

Subscribe

हे काम कांदळवनालगत झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता कारवाई करण्यात आली.

भाईंदर :- भाईंदर पश्चिमेच्या राधास्वामी सत्संग वॉकिंग रोड लगत कांदळवन क्षेत्रात पर्यावरण विभागाची परवानगी न घेता बेकादेशीररित्या पाईपलाईन टाकल्याप्रकरणी शहरातील सूर्या पाणी पुरवठा अंथरणे व्यवस्थेचे कंत्राटदार मे. इगल इन्फ्रा इंडिया कंपनी यांच्याविरोधात अपर तहसीलदारांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाईंदरमधील फॉर फ्युचर इंडिया या संस्थेचे अध्यक्ष हर्षद ढगे आणि सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी अपर तहसीलदारांकडे २८ ऑक्टोबर २०२३ रोजी कांदळवन क्षेत्रात बेकायदेशीर खोदकाम करून पाईपलाईन टाकल्याबाबत तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर लगेच कारवाई म्हणून कांदळवन आणि इतर झाडांवर मातीचा भराव करत असलेल्या तर कांदळवन झाडांचे नुकसान केल्याप्रकरणी जेसीबी जप्तीची कारवाई करण्यात आली. प्राप्त तक्रारीनुसार तालुका स्तरीय कांदळवन उपसमितीकडून ३० नोव्हेंबर २०२३ रोजी स्थळ पाहणी करण्यात आली होती. त्याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी, ठाणे (कांदळवन) मुंबई, कांदळवन संधारक घटक यांनी अपर तहसीलदारानां वस्तुस्थिती कळविली होती. तसेच त्या ठिकाणी कंत्राटदार मे. इगल इन्फ्रा इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीने खोदकाम केल्याबाबतचा अहवाल पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर यांनीही २९ डिसेंबर २०२३ रोजी दिला आहे. त्या अनुषंगाने मौजे भाईंदर सर्वे क्रमांक १९ आणि १९५ ही जागा कांदळवनापासून ५० मीटर अंतराच्या आत असल्याचे नमूद केले आहे. त्या जागेवर मीरा- भाईंदर महापालिकेने भाईंदर पश्चिम राधास्वामी सत्संग जॉगिंग ट्रक (रोड) लगतच विनापरवानगी ४०० मी. लांबीची अंदाजे पाईपलाईन खोदून बुजविली आहे. या कामात सुबाभूळ, भेंडी आणि अवसिनिया मरीनाच्या काही झाडांच्या फांद्या तुटलेल्या आहेत. हे काम कांदळवनालगत झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

बॉक्स

कांदळवन क्षेत्रात बेकादेशीर पाईपलाईन जोडणीच्या कामात कांदळवन क्षेत्रात रोड लगत करण्यात आलेला भराव व इतर बांधकामे हटवून कारवाई करावी. तसेच संबंधित ठेकेदारास कंत्राटदाराच्या काळ्या यादीत टाकून महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि इतर जबाबदार अधिकार्‍यांस निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमी आणि गो ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष साबीर सय्यद यांच्याकडून करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -