भाईंदर : मीरा -भाईंदर शहराला अनधिकृत फलक मुक्त ठेवण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना प्रभावी ठरत असून यात काही वर्षांपासून महापालिकेला यश येत आहे. यंदाच्या वर्षातही शहराला अनधिकृत फलक मुक्त ठेवण्यासाठी पालिकेने नियुक्त केलेली पथके सक्रीय झाली आहेत.अनधिकृत जाहिरात फलक मुक्त शहर ही ओळख कायम ठेवण्यासाठी नागरिकांचे सुद्धा सहकार्य लाभत आहे, असे महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांनी सांगितले आहे.विकसित होत असलेल्या मीरा -भाईंदर शहराला अनधिकृत फलकांचा विळखा होता. जागोजागी इमारतींवर, चौकांत, सिग्नललगत, रस्त्यांवरील दुभाजकांवर, दुकानांच्यापुढे, पदपथांवर बेकायदेशीरपणे बॅनर, पोस्टर्स, बिलबोर्ड, स्टेंडी, हँगिंग आदी जाहिरात फलके लावण्यात आलेली होती. त्यामुळे शहर विद्रूप दिसत होते. शहराला अशा अनधिकृत फलकांपासून मुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरु केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने ५ सप्टेंबर २०१८ ला महासभेत ठराव संमत केला होता आणि कठोर उपाययोजना सुरु केल्या आणि संपूर्ण शहरातील अनधिकृत फलके हटविली गेली. शहरातील सर्व प्रभागांमध्ये पथकामार्फत निरीक्षण करून अनधिकृत फलकांची नोंद केली जाते, मग त्यावर कारवाई करून ते हटवले जात आहेत . त्यामुळे शहर अनधिकृत जाहिरात फलकांपासून मुक्त झाले आहे.
Illegal posters : शहर अनधिकृत फलकमुक्त ठेवण्यासाठी पथके सक्रीय
written By My Mahanagar Team
Bhayandar
शहरातील सर्व प्रभागांमध्ये पथकामार्फत निरीक्षण करून अनधिकृत फलकांची नोंद केली जाते, मग त्यावर कारवाई करून ते हटवले जात आहेत . त्यामुळे शहर अनधिकृत जाहिरात फलकांपासून मुक्त झाले आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -