त्या १९ गावांना तत्काळ मोटर पंपाद्वारे पाणीपुरवठा करा – आमदार राजेश पाटील

बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील यांनी केळवे पूर्वेकडील झांझरोळी धरणाशी सलग्न असलेल्या १९ गावांतील सरपंच व प्रमुख पदाधिकारी यांची पाणीपुरवठा नियोजन करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती.

बोईसर विधानसभा आमदार राजेश पाटील यांनी केळवे पूर्वेकडील झांझरोळी धरणाशी सलग्न असलेल्या १९ गावांतील सरपंच व प्रमुख पदाधिकारी यांची पाणीपुरवठा नियोजन करण्यासाठी एक बैठक सफाळे येथील देवभूमी हॉल येथे आयोजित केली होती. आमदार राजेश पाटील आणि उंबरपाडा-सफाळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजेश म्हात्रे यांच्यामार्फत या गावांना तीन दिवसांपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु, १९ गावांतील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा केला जावा. यासाठी आमदार राजेश पाटील यांनी पालघर तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच पाणीपुरवठा अधिकारी यांना तत्काळ संपर्क करून झांझरोळी धरणावर अधिकारी, माजी राज्यमंत्री मनिषा निमकर, गावातील सर्व सरपंच यांनी पाहणी केली. तसेच तत्काळ मोटरपंप आणि पाईपची व्यवस्था करून सर्व ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या समवेत माजी राज्यमंत्री तथा जिल्हा परिषद सदस्या मनिषा निमकर, पंचायत समिती सदस्य रुपेश धांगडा, उंबरपाडा-सफाळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजेश म्हात्रे, माजी जिल्हापरिषद सदस्य योगेश पाटील, पालघर तालुका अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा बँकेचे संचालक नागेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संदिप सावे, पी. टी. पाटील , युवा कार्यकर्ते समीर म्हात्रे, संघटक मिलिंद साखरे, युवा कार्यकर्ते सचिन अक्रे, प्रकाश गावड आणि संबंधित सर्व गावांतील सरपंच व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –

आरबीआयचा कर्जदारांना मोठा झटका; गृह, वाहन कर्ज महागणार