घरपालघरमहाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक जव्हार येथे पडली पार

महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक जव्हार येथे पडली पार

Subscribe

संविधान वाचवण्यासाठी हे हुकुमशाही सरकार उलथून टाकण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक काळामध्ये काम करणे गरजेचे आहे.

जव्हार : देशाला येणार्‍या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. यात सर्वच राजकीय पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. हीच पार्श्वभूमी लक्षात घेता महाविकास आघाडीतील सर्व घटक पदाधिकारी राजकीय कार्यकर्ते एकत्र यावेत, यासाठी जव्हारच्या यशवंत नगर येथील “घाची” सभागृहामध्ये आज ३० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुनील भुसारा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विकास मोरे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी किरण गहला, इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विकास मोरे यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करून भाजप मुक्त पालघर जिल्हा करूया, यासाठी सर्वच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. याला दुजोरा देत आमदार सुनील भुसारा यांनी सांगितले की, विद्यमान सरकारच्या काळात सर्वच शासकीय योजनांचा बोजवारा उडाला आहे. सामान्य माणसाची कामे होत नसल्यामुळे या सरकारच्या विषयी जनतेत चीड निर्माण झाली आहे. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी किरण गहला यांनी सांगितले की, संविधान वाचवण्यासाठी हे हुकुमशाही सरकार उलथून टाकण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक काळामध्ये काम करणे गरजेचे आहे.

या बैठकीला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रफुल्ल पवार, विक्रमगड विधानसभा समन्वयक विजय अंभिरे, शिवसेना तालुकाप्रमुख श्रावण खरपडे, शहर प्रमुख परेश पटेल, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बळवंत गावित, तालुका अध्यक्ष संपत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप माळी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे यशवंत घाटाळ, बहुजन विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष एकनाथ दरोडा, तसेच सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -