घरपालघरवसई- विरार करांसाठी महत्वाची बातमी...पालिकेचा मोठा निर्णय

वसई- विरार करांसाठी महत्वाची बातमी…पालिकेचा मोठा निर्णय

Subscribe

सातत्याने पेट्रोल, डिझेल इंधनाच्या किंमती वाढत आहेत. वाढत्या इंधन दरवाढीमुळे वाहनचालकांचे आर्थिक गणिते कोलमडून गेले आहे. इंधन दरवाढीला पर्याय म्हणून आता विद्युत (इलेक्ट्रिक ) वाहनांकडे पाहिले जात आहे.

वसई, देशभरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांतही ईलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे.नागरिक कमी आवाज आणि कमी प्रदूषण करणार्या इलेट्रिक वाहनांना पसंती देत आहेत.या शहरांपैकी एक असलेल्या वसई- विरार शहरात विद्युत वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल
वाढला आहे. ही वाहने चार्जिंग करण्यासाठी वसई -विरार शहरात महापालिकेकडून विद्युत वाहनांसाठी चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामुळे शहरात विद्युत वाहनांचा वापर वाढून प्रदूषण नियंत्रणासाठी मोठी मदत होईल असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. सातत्याने पेट्रोल, डिझेल इंधनाच्या किंमती वाढत आहेत. वाढत्या इंधन दरवाढीमुळे वाहनचालकांचे आर्थिक गणिते कोलमडून गेले आहे. इंधन दरवाढीला पर्याय म्हणून आता विद्युत (इलेक्ट्रिक )
वाहनांकडे पाहिले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -