घरपालघरपालघर जिल्हा व्हेंटिलेटरवर; भाजपचा सरकारवर आरोप

पालघर जिल्हा व्हेंटिलेटरवर; भाजपचा सरकारवर आरोप

Subscribe

कोरोना रुग्णांची उपाचाराठी होणारी फरपट, रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा, रुग्णवाहिकेंची कमतरता, खासगी प्रयोग शाळेंकडून होणारी लूट, मच्छिमारांचा कोरोनामुळे उपासमार, विकास कामांचा प्रश्न ऐरणीवर, कामगारांचा वेतन कपात, नाका कामगारांचा उपासमार या सगळ्या कारणांनी पालघर जिल्हा ढवळून निघाला आहे.

कोरोना रुग्णांची उपाचाराठी होणारी फरपट, रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा, रुग्णवाहिकेंची कमतरता, खासगी प्रयोग शाळेंकडून होणारी लूट, मच्छिमारांचा कोरोनामुळे उपासमार, विकास कामांचा प्रश्न ऐरणीवर, कामगारांचा वेतन कपात, नाका कामगारांचा उपासमार या सगळ्या कारणांनी पालघर जिल्हा ढवळून निघाला आहे. एक खासदार सहा आमदार आणि एक पालकमंत्री असताना सोई सुविधांच्या बाबतीत आदिवासी बहुल जिल्हाच व्हेंटिलेटरवर असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केला आहे.

कोरोना रुग्णांची दिवसागणिक प्रचंड प्रमाणात वाढ होत असल्याने रुग्णालये कमी पडू लागले आहेत. चिंताजनक स्थितीत असलेल्या रुग्णांना ओक्सिजनची उपलब्धता होत नसल्याने आपला जीव गमवावा लागत आहे. त्यात रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा असल्याने खासगी दलालांमार्फत औषधांचा काळाबाजार केला जात आहे. रुग्णांची अवस्था दयनीय असताना रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा कायम राहिला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत कमतरता असल्याने खासगी रुग्णवाहिकांकडून रुग्णांची लूट केली जात आहे. चाचणीसाठी खासगी प्रयोगशाळांमधून लूट केली जात आहे. कोरोनामुळे मच्छिमार अडचणीत आला आहे. औद्योगिक वसाहतीमधील कामगारांचा रोजगार बुडाला आहे. जिल्ह्याला एक खासदार, सहा आमदार आणि एक पालकमंत्री असतानाही जिल्हा व्हेंटीलेटरवर असल्याचा पाटील यांचा आरोप आहे.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यात कोरोनाबाबत अवस्था दयनीय आहे. सर्वत्र रुग्णांना जास्तीत जास्त ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला पाहिजे. यासंकट समयी सरकारने संवेदनशिलतेने जिल्ह्यातील रुग्णांसाठी औषध साठा पुरवला पाहिजे.
– आमदार हितेंद्र ठाकूर

पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पालकमंत्री स्वतःच्या जिल्ह्यातून कारभार हाकत आहेत. दै. आपलं महानगरने याबाबत वृत्त दिल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे आढावा घेण्यासाठी धावती भेट देऊन निघून गेले. जिल्हा नियोजन समितीलाही याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक यांच्यासह अनेक दिग्गज जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. पण, त्यांचेही कोरोनाच्या प्रश्नावर कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

सोनू सूद नागपूरातील कोरोना रुग्णाच्या मदतीस आला धावून, मिळून दिला रुग्णालयात बेड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -