घरपालघरबारावीच्या परीक्षेत मुंबई विभागातून पालघर जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर

बारावीच्या परीक्षेत मुंबई विभागातून पालघर जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर

Subscribe

सर्व विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापकांचे पालक मंत्री , जिल्हा परिषद अध्यक्ष ,जिल्हाधिकारी, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद पालघर यांनी अभिनंदन केले आहे.

पालघर: उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेच्या निकालात मुंबई विभागातून पालघर जिल्ह्यातील उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण 90.76 टक्के असून मुंबई विभागात निकालाची टक्केवारीमध्ये पालघर जिल्हा दुसर्‍या क्रमांकावर आहे. पालघर जिल्ह्यात 92.59 मुलींनी उत्तीर्ण होऊन बाजी मारत सलग तीन वर्षे मुलींनी जिल्ह्यात टक्केवारी राखली आहे. पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असून या जिल्ह्यातील मोखाडा या अतिदुर्गम भागातील 94.73% विद्यार्थी उत्तीर्ण होऊन मोखाडा तालुका जिल्ह्यात प्रथम स्थानी आला आहे. पालघर जिल्ह्यातून 27 हजार 416 मुले व 22 हजार 386 मुली असे 49 हजार 448 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यात 24 हजार 277 मुले आणि 20 हजार 602 मुली असे एकूण 44 हजार 879 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात 92.59% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 89.24 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापकांचे पालक मंत्री , जिल्हा परिषद अध्यक्ष ,जिल्हाधिकारी, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद पालघर यांनी अभिनंदन केले आहे.

1) वाडा तालुक्यातील 1214 मुले व 1235 मुली असे एकूण 2449 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये 2109 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

- Advertisement -

2)मोखाडा तालुक्यात 588 मुले 438 मुली असे एकूण 1026 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते यामध्ये 972 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

3)विक्रमगड तालुक्यात 842 मुले व 736 मुली असे एकूण 1578 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते यामध्ये 1374 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

- Advertisement -

4)जव्हार तालुक्यातील 622 मुले व 597 मुली असे एकूण 1219 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते यामध्ये 851 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

5)तलासरी तालुक्यात 1535 मुले व 1565 मुली असे एकूण 3 हजार 100 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यामध्ये 200771 विद्यार्थी उत्तीर्ण झाले,

6)डहाणू तालुक्यातील 2491 मुले व 2044 मुली असे 4500 विद्यार्थी पैकी 3861 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

7)पालघर तालुक्यातील 3134 मुले व 2959 मुली असे एकूण सहा हजार 93 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते यामध्ये 5494 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

8)वसई तालुक्यात सर्वाधिक 16772 मुले व बारा हजार 676 मुली असे एकूण 29 हजार 448 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यामधून 27 हजार 447 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

 

 

मनोरमध्ये मुलींची बाजी

जनरल एज्युकेशन सोसायटी संचालित सत्यभामा यशवंत चाफेकर कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 85 टक्के लागला आहे.तर नागझरीच्या स्वर्गीय विद्या विनोद अधिकारी कॉलेजच्या तिन्ही शाखांचा निकाल 99.64% लागला असून फक्त दोन विद्यार्थी नापास झाले आहेत.

जव्हारच्या गोखले कला व वाणिज्य महाविद्यालयाचा निकाल 78 टक्के

जव्हार तालुक्यातील अग्रगण्य समजली जाणारी, गोखले एज्युकेशन सोसायटीचे के. व्ही. हायस्कूल व आर वाय जुनियर कॉलेज महाविद्यालयाने उज्जवल यशाची परंपरा कायम राखीत सर्वाधिक निकालाची 78 टक्के नोंद केली आहे.
वाणिज्य शाखेतून सुलेमानी शाहिद गुलाम नबी 78.83 गुण मिळवून प्रथम आला आहे. तर अमोल तुंबडा हा विद्यार्थी 77.16 टक्के गुण संपादित करून द्वितीय आला आहे. कला शाखेतून करपट राणी चंद्रकांत 76.33 ही प्रथम आली असून टोपले विपुल रघुनाथ या विद्यार्थ्याने 75 टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

मीरा -भाईंदरमधील 91.49 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाकडून फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे एकूण 42 केंद्र होते. कला, वाणिज्य, विज्ञान या तिन्ही शाखांतून एकूण 7,482 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी एकूण 6 हजार 846 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. मीरा-भाईंदरच्या या वर्षी बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 93.02 टक्के आहे. तर मुलांचे प्रमाण 90.13 टक्के आहे. मीरा भाईंदरचा बारावीचा निकाल एकूण 91.49 टक्के लागला आहे.

वाड्यात नॅशनल इंग्लिश स्कूलचा 98 टक्के निकाल

आज बारावीचा निकाल लागला असून कुडूस येथील नॅशनल इंग्लिश स्कूलचा 98 टक्के निकाल लागला आहे. कॉमर्स शाखेत प्राजक्ता लहू शेलार ही विद्यार्थिनी 94.33 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. सक्षम जयस्वाल 90.83,परवेज अयुब खान 82 टक्के गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तर सायन्स शाखेत तन्वी पष्टे 77.67 भुमिका पाटील 74 तर सलोनी पाटील ही विद्यार्थीनी 72 टक्के गुण मिळवून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.सायन्स शाखेत 126 विद्यार्थी बसले होते.त्यापैकी 123 विद्यार्थी पास झाले. तर कॉमर्स 64 विद्यार्थी बसले होते पैकी 60 विद्यार्थी पास झाले.

निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा 98% निकाल*

सफाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्था संचलित राजगुरू ह. म. पंडित विद्यालय व निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालयाचा सन उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल 96.77% लागला आहे. महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल 95.18% (एकूण मुले 187 पैकी 178 उत्तीर्ण), तर वाणिज्य शाखेचा निकाल 100% (एकूण मुले 92 पैकी 92 उत्तीर्ण) झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -