घरपालघरवसई पंचायत समिती ताब्यात; नाराजीमुळे बविआत बंडखोरीची लागण

वसई पंचायत समिती ताब्यात; नाराजीमुळे बविआत बंडखोरीची लागण

Subscribe

वसई पंचायत समितीची सत्ता बहुजन विकास आघाडीने पोटनिवडणुकीमुळे पुन्हा काबिज केली आहे. गीता पाटील सभापतीपदी निवडून आल्या आहेत.

वसई पंचायत समितीची सत्ता बहुजन विकास आघाडीने पोटनिवडणुकीमुळे पुन्हा काबिज केली आहे. गीता पाटील सभापतीपदी निवडून आल्या आहेत. मात्र, सभापतीपदावरून नाराजी नाट्य होऊन बविआमध्येच बंडखोरी झाल्याचेही दिसून आले आहे. पोटनिवडणुकीच्या दोन महिन्यांनी वसई पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली. सभापतीपदासाठी बविआच्या सविता पाटील इच्छूक होत्या. पण, शिवसेनेतून आलेल्या गीता पाटील यांना बविआने पोटनिवडणुकीत मैदानात उतरवले होते. त्यांनी शिवसेनेचा पराभव केल्याने बविआने त्यांनाच सभापतीपद दिले. त्यामुळे नाराज झालेल्या सविता पाटील यांनी बंडखोरी करत सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे बविआत खळबळ माजली होती. प्रत्यक्षात मात्र, सविता पाटील निवडणुकीलाच गैरहजर राहिल्या होत्या. तर शिवसेना आणि भाजपही निवडणुकीपासून अलिप्त राहले होते. परिणामी गीता पाटील यांची बिनविरोध निवड झाली.

पोटनिवडणुकी आधी पंचायत समितीत शिवसेना-भाजपची सत्ता होती. ओबीसी आरक्षणामुळे शिवसेनेच्या तीनपैकी दोन सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागा बविआने जिंकल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेचा अवघा एकच सदस्य राहिल्याने शिवसेना-भाजची सत्ता संपुष्टात आली होती. बविआ पुन्हा सत्तेत आली असली तरी सत्ता मिळवताना बंडखोरीचा कलंक मात्र माथी बसला आहे. बविआकडे बहुमत असल्याने उपसभापतीपदावर बविआ दावा ठोकणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेश पाटील, ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, माजी पंचायत समिती सभापती नरेंद्र पाटील यांनी गीता पाटील यांचे अभिनंदन केले.

- Advertisement -

हेही वाचा –

HIV crisis : सेक्ससाठी महिलांच्या कंडोमचा पुरूषांकडून वापर, केनियात कंडोम शॉर्टेज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -