नांदगाव ते कुर्लोद रस्त्याची झाली चाळण; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

मोखाडा तालुक्याचे शेवटचे असलेले टोक कुर्लोद हा अतिदुर्गम भाग आहे. या गावाकडे जाण्याचा मार्ग नांदगाव मार्गे कुर्लोद असा रस्ता आहे.

मोखाडा तालुक्याचे शेवटचे असलेले टोक कुर्लोद हा अतिदुर्गम भाग आहे. या गावाकडे जाण्याचा मार्ग नांदगाव मार्गे कुर्लोद असा रस्ता आहे. परंतु रस्ता हा मोखाडा आणि जव्हार या दोन तालुक्यातील येणारा अर्धा-अर्धा रस्ता आहे. त्यामुळे रस्त्याची खूपच चाळण झालेली आहे. परिणामी लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नांदगाव मार्गे कुर्लोद जाणारा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्या कारणाने त्या रस्त्याची आजची परिस्थिती अशी आहे की, त्या रस्त्यावरून वाहन घेऊन जाणे अगदी जिकिरीचे झाले आहे. मोटार सायकलवरून प्रवास करणारे प्रवाशी तर त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. लोकांना प्रवास हा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

कुर्लोद येथील गावकऱ्यांना बाजारासाठी, कपडे खरेदीसाठी, कोणत्याही वस्तूसाठी ये-जा करावी लागते. तसेच तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे सर्व ऑफिस देखील याच ठिकाणी आहेत. शिवाय मुलांना शाळा-कॉलेजसाठी मोखाडा शहर गाठावे लागते. परंतु रस्त्याची दुरवस्था असल्यामुळे त्या रस्त्यावरून ये-जा करणे खूपच कठिण झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले. अतिदुर्गम भाग असल्यामुळे त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी कुठलीही दखल घेताना दिसत नाहीत, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. फक्त मत मागण्यासाठीच कुर्लोद गाव दिसतो. इतर वेळी दिसत नाही का?, असा सवाल गावकऱ्यांनी केला आहे. या सगळ्या गोष्टींना कारणीभूत कोण, असा गावकऱ्याकडून प्रश्नही उपस्थित होत आहे. तसेच लवकरात लवकर चौकशी करून रस्ता मंजूर करून तयार करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

रस्त्याची दुर्दशा लवकरात लवकर मिटावी, यासाठी संबंधित विभागाने रस्त्याची डागडुजी न करता संपूर्ण रस्ताच नव्याने करावा. अन्यथा गावकरी आंदोलन करणार.
– राजेंद्र पालवे, ग्रामस्थ, कुर्लोद

बाराशे मीटर रस्ता मंजूर आहे. ठेकेदाराच्या हातात आहे तो कधी बनवायचा.
– इरफान पठाण, शाखा अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, मोखाडा

कुर्लोद रस्त्याची दुरवस्था लवकरात लवकर चांगल्या स्थितीला यावी. नागरिकांचा त्रास कमी व्हावा.
– मिलिंद झोले, जिल्हाध्यक्ष, आदिवासी आघाडी, भाजप

रस्ता मंजूर झाला असून टेंडर बनवणे चालू आहे. लवकरात लवकर ते काम पूर्ण करू. लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ.
– सुनील घुगे, उपअभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जव्हार

हेही वाचा –

शिवसेना देणार सहावा उमेदवार, संभाजीराजेंचा मार्ग खडतर