Homeपालघरआधारभूत धान्य खरेदी केंद्रांचे उद्घाटन

आधारभूत धान्य खरेदी केंद्रांचे उद्घाटन

Subscribe

तसेच हे पैसे थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार असल्याने पारदर्शक कारभाराचा आधार घ्यावा असेही यावेळी भुसारा यांनी सांगितले.

जव्हार: आज बुधवारी सकाळी ११.३० वाजता आमदार सुनिल भुसारा यांच्या हस्ते राज्य आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून होणार्‍या आधारभूत खरेदी केंद्राचे उद्घाटन जव्हार आणि मोखाडा येथे झाले. यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक म्हणून उपस्थितांना संबोधित करताना भुसारा म्हणाले की, यंदा महामंडळाकडून प्रति क्वींटल २,१८३ तर ’अ’ दर्जा साठी २२०३ रुपये एवढा भाव दिला आहे. व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्यासाठी महामंडळाच्या अधिकृत खरेदी केंद्रावर आपले धान्य द्यावे , विशेष म्हणजे मागील वर्षीपासून नागलीची देखील आधारभूत केंद्रावर खरेदी होणार असल्याची माहिती देत शेतकर्‍यांनी आपले धान्य या केंद्रात द्या, असे आवाहन भुसारा यांनी यावेळी केले. तसेच हे पैसे थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार असल्याने पारदर्शक कारभाराचा आधार घ्यावा असेही यावेळी भुसारा यांनी सांगितले.

आपल्या विक्रमगड विधानसभा क्षेत्रात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या असून येत्या अधिवेशन काळात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई तात्काळ मिळावी, म्हणून मागणी करणार आहे. महामंडळ कार्यालयात बनावट बँक गॅरंटी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रशासन याबाबत सखोल चौकशी करीत आहे. यापूर्वी देखील असे काही प्रकार झाले आहेत का? याची देखील सखोल चौकशी केली जाईल असे आमदार भुसारा यांनी बोलताना सांगितले. यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील, राजेश पवार, माजी नगराध्यक्ष रियाज मणियार, सरपंच संदीप माळी, इरफान शेख आणि इतर कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.