घरपालघरमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पालघर जिल्हा मुख्यालयाचे उद्घाटन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार पालघर जिल्हा मुख्यालयाचे उद्घाटन

Subscribe

गेल्या काही वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा मुख्यालयाचे उद्घाटन गुरुवार, १९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या जिल्हा मुख्यालयाचे उद्घाटन गुरुवार, १९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यालयांच्या इमारतींसाठी ३०७ कोटी ६५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. याचदिवशी वसई-विरार महापालिकेच्या विविध विकासकामांचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले जाणार आहे. पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर नगरविकास विभागाने सिडकोला पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र अशी प्रशस्त इमारत उभारण्यात यावी, असे आदेश दिले होते. सिडकोच्या यंत्रणेने त्यासाठी अद्यावत असे नियोजन करून पाच इमारतींचे डिझाईन तयार केले आहे. त्यामध्ये इमारतीच्या उत्कृष्ट वास्तुकलेचा वापर करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि पोलीस अधीक्षक कार्यालय इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीचे अंतर्गत कामे रंगरंगोटीसह पूर्ण करण्यात आली आहेत. या इमारतीच्या कामास २१ ऑगस्ट २०१७ रोजी सुरूवात करण्यात आली होती. ३० जून २०२१ रोजी हे काम पूर्ण झाल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

पालघर जिल्हा मुख्यालयातील तीन मुख्य विभागा सह प्रशासकीय इमारती उभ्या करण्याबरोबरच अन्य बाबीसाठी प्रथम रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा भरल्या होत्या. मात्र शहरे उभारण्याचा सिडकोच्या अनुभवाला प्राधान्य देत त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. सिडकोला पालघर (कोळगाव) येथील दुग्धविकास विभागाची एकूण ४४० हेक्टर जमीन देण्यात आली असून त्यापैकी १०३ हेक्टर जमिनीवर सध्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद प्रमुख विभागाच्या इमारतीसह अन्य विभागासाठी एक प्रशासकीय इमारत उभी राहिली आहे. या इमारतीच्या उभारणीचा ठेका राज्यशासनाने सिडकोला दिला असला तरी त्यांनी खासगी ठेकेदारांना हे काम दिल्याने कामाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. भूमिपूजन झाल्यानंतर ठेकेदारांना दिलेल्या मुदतीनुसार प्रथम २०१९ पर्यंतच्या मुदतीला अनेक वेळा वाढवून देण्याची नामुष्की सिडकोवर आली होती.

दरम्यान, वसई विरार महापालिकेच्या काही विकास कामांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे, अशी स्थानिक शिवसेना नेत्यांची मागणी होती. पण, मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्याने आता व्हिडीओ कॉन्स्फरिंगद्वारे कामांचे उद्घाटन केले जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

भारत आमच्यासाठी मोठा भाऊ; अफगाणी विद्यार्थ्यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -