पालघरः पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटात उध्दव ठाकरे गटासह मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक पदाधिकार्यांनी प्रवेश घेतला. यावेळी त्यांना पदांचे वाटप करण्यात आले. बोईसर येथे शिवसेना ठाणे शहरप्रमुख अशोक वैती यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बैठक पार पडली. यावेळी पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हा संघटक वैदेही वाढाण हजर होत्या. या बैठकीत उध्दव ठाकरे गटासह मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक पदाधिकार्यांनी प्रवेश केला. यावेळी प्रतिभा संजु तांडेल(शाखाध्यक्ष,वाणगाव),मनिषा भानूदास कडू (उप-विभाग संघटिका,धाकटी डहाणू-पंचायत समिती),नयना दुर्वेश दुबळा (उप- विभागसंघटिका, वाणगाव-पंचायत समिती), स्नेहल कल्पेश कोम (शाखा संघटिका,आसनगाव), अंजली योगेश पाटील (शाखा संघटिका,वरोर तिघरेपाडा), सुरेखा अण्णा तांबडा (शाखा संघटिका,धानिवरी), गिता मुकेश मडवे (शाखा संघटिका,ओसार),सचिन पांडूरंग राऊत (शहरअध्यक्ष वाहतूक सेना), संदिप मदन बारी (विभागप्रमुख,वाणगाव), मनोज रमेश पिंपरी (विभागप्रमुख,नवापूर ग्रामपंचायत),राजेश इभाड (उप-विभागप्रमुख,कासा पंचायतसमिती),संकेत राऊत.(शाखाप्रमुख,वाणगाव), तुषार बाती (उप- शाखाप्रमुख,वाणगाव) सुधीर घाटाळ(युवासेना उप-तालुकाध्यक्ष,मुरबाड)धर्मेंद्र रविंद्र गोवारी(शाखाप्रमुख,नवापाडा)राजेंद्र परशुराम मडवे(शाखाप्रमुख,ओसार-तणाशी)पांडु गणपत डुकले (विभागध्यक्ष,रणकोट)दिनेश कल्लू बोलाडा(उप-विभागप्रमुख,रणकोट)नितीन सोमय्या कीणी (शाखाप्रमुख,वासगाव) अशी नेमणूक केली.