घरपालघररस्त्यावरील मोरीचा पाईप तुटल्याने नागरिकांची गैरसोय

रस्त्यावरील मोरीचा पाईप तुटल्याने नागरिकांची गैरसोय

Subscribe

गुंदावे गावच्या ग्रामस्थांना होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी आठवडाभरात लघुपाटावरील मोरीचा फुटलेला सिमेंट बदलून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

मनोर :  वरई-पारगाव रस्त्यापासून एक किलोमीटर अंतरावरील दहिसर तर्फे मनोर ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बहुल लोकसंख्या असलेले गुंदावे वसले आहे.गावाला वरई-पारगाव रस्त्याला जोडणार्‍या रस्त्यावरील लघु पाटाच्या मोरीचा सिमेंट पाइप जीर्ण झाला होता.सुमारे तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी लघुपाट तयार करण्यात आला होता. जुने बांधकाम आणि मोरीचा सिमेंट जीर्ण झाल्याने वाहनांच्या वजनाने जून महिन्यात फुटला आहे. फुटलेला सिमेंट पाईप वरून वाहने गेल्याने सिमेंट पाईपच्या ठिकाणी मोठा खड्डा पडला आहे. खड्ड्यामुळे ग्रामस्थांनी रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक बंद करून एकेरी वाहतूक सुरू ठेवली आहे.लघुपाटावरील सिमेंट पाइप फुटून रस्त्यावर खड्डा पडल्याची माहिती ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाला दिली होती. परंतु ,पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मोरीवरील खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून ग्रामस्थांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याने संताप व्यक्त केला आहे.गुंदावे गावच्या ग्रामस्थांना होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी आठवडाभरात लघुपाटावरील मोरीचा फुटलेला सिमेंट बदलून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

गुंदावे गावच्या रस्त्यावरील लघुपाटावरील मोरीच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रकात तयार करण्यात आले असून मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. मंजुरी मिळताच सिमेंट पाइप बदलण्यात येईल.
– निलकमळ गवई,
उप कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग,मनोर.

- Advertisement -

लघुपाटावरील मोरीच्या फुटलेल्या पाईपच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष संतापजनक आहे. फुटलेला सिमेंट पाईप तत्काळ बदलून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी.
– रुपेश केणी, ग्रामपंचायत सदस्य, दहिसर तर्फे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -