घरपालघरपावसामुळे अपघातात वाढ; हायवेवर दोन अपघात

पावसामुळे अपघातात वाढ; हायवेवर दोन अपघात

Subscribe

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवण येथे पिकअपचा भीषण अपघात झाला आहे. गुजरातहुन मुंबईच्या दिशेने जात असताना पिकअप चालकाने एका कॅटेनरला धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. दुसऱ्या एका घटनेत इनोव्हा कारचालकाने अर्जंट ब्रेक दाबल्याने अपघात झाला आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवण येथे पिकअपचा भीषण अपघात झाला आहे. गुजरातहुन मुंबईच्या दिशेने जात असताना पिकअप चालकाने एका कॅटेनरला धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. दुसऱ्या एका घटनेत इनोव्हा कारचालकाने अर्जंट ब्रेक दाबल्याने अपघात झाला आहे. यात कुणीही जखमी झालेले नाही. सद्या पावसाळी हवामान असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असून वाहनचालकांनी वाहन चालवताना दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी तसेच नशा करून वाहन चालवू नये. वेगावर नियंत्रण ठेवावे. वाहतूक नियमाचे उल्लंघन करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. महामार्गावर अपघात झालेला दिसल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी. ह्याआधी चारोटी येथील कैलास चौरे, इद्रिस सोलंकी व इतर महामार्ग मृत्युंजय दूत यांनी अपघाताची वेळीच माहिती दिल्याने व अपघातग्रस्तांना मदत केल्याने अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यास मदत झाली आहे. महामार्ग पोलिसांच्यावतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. सर्वांनी अपघातग्रस्तांना अशाच पद्धतीने मदत करावी असे आवाहन करतो.
– अनिल रायपुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र चारोटी

- Advertisement -

मेंढवणजवळ झालेल्या पिकअपच्या अपघातामागे चालक दारुच्या नशेत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे त्याचा सहाय्यकही दारू प्यालेला होता. अपघातात पिकअपमधील एक जण किरकोळ जखमी असून त्यांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पिकअपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दुस-या एका घटनेत येथून जवळच एक इनोव्हा कार गुजरातच्या दिशेने जात असताना अर्जंट ब्रेक घेतल्यामुळे पहिल्या लेनवर संरक्षक कठड्यावर चढली. यात कोणालाही दुखापत झालेली नसली तरी कारचे नुकसान मात्र झाले आहे.
सध्या पावसाळ्यामुळे गाडी चालवताना वाहन चालकाने विशेष काळजी घेणे गरजेचे असताना काही वाहन चालक नशा करून वाहन चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळेच महामार्गावर वारंवार अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. मेंढवणसारख्या डोंगराळ भागात पाऊस जास्त प्रमाणात पडत असल्यामुळे तेथे अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा ठिकाणावरून प्रवास करताना विशेष काळजी घेऊन वाहन चालवणे आवश्यक आहे. परंतु काही वाहनचालक नियमांची पायमल्ली करून अतिशय वेगात वाहने चालवत असतात व त्यामुळेच हे अपघाताचे प्रकार वाढत आहेत. म्हणूनच पावसाळ्यात शक्यतो वेग नियंत्रित ठेऊनच वाहन चालवावे असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Fake Covid-19 Vaccination: मुंबईनंतर ठाण्यातही बनावट लसीकरण; लाखोंचा भुर्दंड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -