घरपालघरठेका कर्मचार्‍यांना नियमानुसार वेतनवाढ

ठेका कर्मचार्‍यांना नियमानुसार वेतनवाढ

Subscribe

या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी युनियनच्या पदाधिकार्‍यांना दिले असून, प्रशासनासही आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत.

वसईः महापालिकेत ठेका पध्दतीवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना शासकीय नियमानुसार वेतनवाढ देण्यात येईल, अशी ग्वाही महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी दिली आहे. त्याचबरोबर कर्मचार्‍यांचे इतर प्रश्नही मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे. वसई-विरार महापालिकेतील कामगारांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या पदाधिकार्‍यांनी आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेतली. या भेटीत महापालिका कर्मचार्‍यांच्या अडीअडचणी, समस्या आणि त्या अनुषंगिक मागण्यांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. महापालिका कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर पालिका सकारात्मक आहे. या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी युनियनच्या पदाधिकार्‍यांना दिले असून, प्रशासनासही आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत.

महापालिकेतील कायमस्वरूपी कर्मचार्‍यांच्या बाबतीत मागील दोन वर्षांपासून युनियनच्या वतीने बैठका आणि पत्रव्यवहार करून सातत्यपूर्ण विविध प्रश्न पालिका प्रशासनांसमोर मांडण्यात आलेले होते. प्रामुख्याने पदोन्नती, कर्मचार्‍यांच्या पगारांत असलेली तफावत, निवृत्तीनंतर देय रक्कम देण्याकरता लागणारा विलंब आदी मागण्यांचा यात समावेश होता. या मागण्यांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने युनियनने आयुक्तांच्या भेटीचे प्रयोजन ठेवले होते. ठेका कर्मचार्‍यांच्या बाबतीत चर्चा होत असताना वेतनवाढीसंदर्भात अग्रक्रमाने चर्चा झाली. आयुक्तांनी शासकीय नियमानुसार वेतनवाढ देण्यात येईल, असे आश्वासन दिले. वर्षानुवर्षे पालिकेची सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांना ठेकेदार पद्धती बंद करून, पालिकेच्या सेवेत ठोक मानधनावर समाविष्ट करून घेण्यात यावे, अशीही मागणी युनियनच्या वतीने करण्यात आली.

- Advertisement -

औषधोपचार तसेच हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळावेत, यासाठी प्रत्येक ठेका कर्मचार्‍याचा विमा उतरण्यात यावा, कायमस्वरुपी कर्मचार्‍यांप्रमाणे ठेका कर्मचार्‍यांचा पगारही सातव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावा, ठेका कर्मचार्‍यांना दरमहा मिळणार्‍या तीन हजार रुपयांच्या प्रवास भत्त्यात वाढ करण्यात यावी, बडतर्फ ठेका कर्मचार्‍यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात यावे, वार्षिक पंधरा दिवसांची भर पगारी सुट्टी ठेका कर्मचार्‍यांना देण्यात यावी इत्यादी मागण्या ठेका कर्मचार्‍यांच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या बैठकीला युनियनच्या वतीने सरचिटणीस विठ्ठल गोळे, उपाध्यक्ष राजाराम मुळीक, सचिव अरविंद बेर्डे तर प्रशासनातर्फे उपायुक्त तानाजी नरळे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -