घरपालघरशहिदांच्या स्मरणार्थ सी-६० जवानांचे भारत भ्रमण

शहिदांच्या स्मरणार्थ सी-६० जवानांचे भारत भ्रमण

Subscribe

यात चार दुचाकी असून ५ कमांडोचा समावेश आहे. २४ दिवसांत एकूण पाच राज्यात जात ७ हजार किलोमीटर दुचाकीवरून जात प्रवास संपणार आहे.

भाईंदर :- आपल्या कामगिरीतून देशातील सर्वोत्तम युनिट म्हणून नावलौकिक मिळवणार्‍या गडचिरोली सी-६० कमांडोसह अनेक जणांनी कर्तव्य बजावत असताना आपले प्राण गमावले आहेत. यात सी-६० च्या ६२ कमांडोसह एकूण २१२ पोलिसांचा समावेश आहे.शहिदांच्या स्मरणार्थ व लोकांना जागरूक करण्यासाठी सी-६० जवानांपैकी ५ – सदस्यीय टीमने ‘गडचिरोली पोलीस शहीद सन्मान यात्रेला’ २५ डिसेंबरपासून सुरूवात केली. यात चार दुचाकी असून ५ कमांडोचा समावेश आहे. २४ दिवसांत एकूण पाच राज्यात जात ७ हजार किलोमीटर दुचाकीवरून जात प्रवास संपणार आहे.

शहीद सहकारी मित्र आणि सहकारी सैनिकांच्या वीरता आणि बलिदाना बद्दल लोकांना सांगून त्यांनी केलेल्या कार्या बाबत सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे. या उद्देशाने शहिदांच्या स्मरणार्थ सी-६० जवानांचे भारत भ्रमण सुरू आहे. यात गडचिरोली पोलीस दलातील किशोर खोब्रागडे, अजिंक्य तुरे, देवा आडोळे, रोहित गोंगळे आणि राहुल जाधव या पाच कमांडोचा समावेश आहे. गडचिरोली येथील शौर्य स्थळ स्मारक येथून त्यांच्या प्रवासाला सुरूवात झाली असून आतापर्यंत राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशचा प्रवास पूर्ण झाला असून मुंबई, पुणे व नागपूर मार्गे पुन्हा परतीचा प्रवास असणार आहे. बुधवारी सकाळी १० च्या सुमारास प्रवासा दरम्यान ५ ही कमांडो मीरा- भाईंदर शहरात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांच्या भेटी करता पोलीस निरीक्षक स्वप्नन विश्वास, सहायक पोलीस निरीक्षक, टिकाराम थाटकर, सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड व इतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या मार्फत गडचिरोली हून प्रवास करत आलेल्या सर्व जवानांचा मीरा- भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -