घरपालघरवाडा बस स्थानकात खासगी गाड्यांचा शिरकाव

वाडा बस स्थानकात खासगी गाड्यांचा शिरकाव

Subscribe

वाड्यातील बस स्थानक हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने बाजारपेठेत कामानिमित्त येणारे दुचाकी व चारचाकी वाहनधारक आपली वाहने चक्क बस स्थानकाच्या आवारात उभी करून जातात.

वाड्यातील बस स्थानक हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने बाजारपेठेत कामानिमित्त येणारे दुचाकी व चारचाकी वाहनधारक आपली वाहने चक्क बस स्थानकाच्या आवारात उभी करून जातात. तर तालुक्याबाहेर जाणारे नोकरदारसुद्धा आपली वाहने येथे लावून निघून जातात. या वाहनांमुळे बस चालकास गाडी आत लावणे, बाहेर काढणे अशा वेळी त्रासदायक ठरत आहे. तर बसमधून उतरलेल्या प्रवाशांना ही या वाहनांमधून वाट शोधावी लागत आहे.

बाहेरील वाहनांनी बस स्थानकात प्रवेश करू नाही किंवा आपली वाहने स्थानकाच्या बाहेरच लावावी, आशा सूचना ध्वनिक्षेपकातून वारंवार केल्या जात आहेत. त्याचबरोबर एका कर्मचाऱ्याची स्थानकात नियुक्ती केली आहे.
– माधव धांगदा, आगार व्यवस्थापक, वाडा आगार

- Advertisement -

महिला-मुलींची छेड काढणाऱ्या रोड रोमोयोंच्या धूम स्टाईलने येरझाऱ्या चालूच असतात. अशा एक ना अनेक समस्यांनी वाडा बस स्थानक ग्रासले आहे. तीन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याची सोळा हजार रुपये असलेली पिशवी अशाच एका दुचाकीस्वाराने लांबवली असल्याची तक्रार या शेतकऱ्याने वाडा पोलिसांत केली आहे. बस स्थानकात बाहेरील वाहनांनी शिरकाव केल्याने येथील प्रवाशी, बसचे चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांना या अनधिकृत पार्किंगच्या वाहनांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वाहनांना वाडा बस स्थानकात मज्जाव करावा, अशी मागणी होत आहे.

बस स्थानकातील अनधिकृत पार्किंग कायमची बंद करण्याबाबतचे पत्र लवकरच वाडा पोलीस व आगार व्यवस्थापकाकडे देणार आहोत.
– किरण थोरात, सचिव, वाडा तालुका प्रवासी संघ

- Advertisement -

 

हेही वाचा –

भिवंडीतील चिंचोटी माणकोली रस्त्याची दुरावस्था; रस्त्यावर तात्पुरती डागडुजी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -