घरपालघरनालेसफाईची आयुक्त, महापौरांकडून पाहणी

नालेसफाईची आयुक्त, महापौरांकडून पाहणी

Subscribe

महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांनी मंगळवारी सकाळी विविध ठिकाणांना भेटी देत नैसर्गिक नालेसफाई तसेच पावसाळी गटारे साफसफाई कामांची पाहणी केली.

मीरा भाईंदर शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या तसेच महारपालिकेच्या संबंधित विभागांच्या आढावा बैठकींमध्ये पावसाळापूर्व कामांबाबत दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांनी मंगळवारी सकाळी विविध ठिकाणांना भेटी देत नैसर्गिक नालेसफाई तसेच पावसाळी गटारे साफसफाई कामांची पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपआयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे सोबत होते.

काशिमीरा येथील महामार्गालगत असलेल्या दिल्ली दरबार व वेस्टर्न पार्क येथील मोठ्या नाल्याची सफाई मोठ्या पोकलेन मशीनच्या साहाय्याने करण्यात येत आहे. वर्सोवा पंजाब फाँड्री येथील नालेसफाई मशीनच्या साहाय्याने करण्यात येत आहे. महामार्गाखालून निघणारा नाला मुंशी कंपाऊंड ते मिरा गाव बस स्टॉपपर्यंत या नाल्याची रुंदी मोठी असल्याने येथील नाल्याची साफसफाई पोकलेन मशीनच्या साहाय्याने करण्यात येत असून त्यासाठी आवश्यकतेनुसार कामगार वाढवण्याच्याही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

- Advertisement -

शहराचा काही भाग समुद्रसपाटीपासून खालच्या पातळीवर असल्याने मोठ्या प्रमाणावर पाऊस व मोठ्या भरतीची वेळ एकच आल्यास त्याठिकाणी पाणी जमा होते. अशा संभाव्य ठिकाणी जादा संक्शन पंपाची तरतूद आतापासूनच करून ठेवावी अशी सूचना आरोग्य विभागाला महापौर व आयुक्त यांनी सूचना दिल्या. यावर्षीची वैशिष्टपूर्ण नालेसफाई म्हणजे सकर मशिनद्वारे हॉटेल सह्याद्री, लक्ष्मीबाग नाला, पंजाब फाँड्री तसेच रस्त्याखालील पूर्व-पश्चिम नाले, भाईंदर रेल्वे समांतर नाल्यांची साफसफाई करण्यात आली. त्यामुळे बालाजी नगर व केबीन रोड या परिसरात पाणी साठणार नसल्याचे विभागाचे अधिका-यांनी सांगितले आहे.

नाल्याची पाहणी करताना मोठ्या नाल्यांच्या स्वच्छतेप्रमाणेच विशेषत्वाने छोट्या नाल्यांच्या सफाईकडे बारकाईने लक्ष देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्याठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असते तेथील साफसफाईवर व पाणी साचू नये यासाठी करावयाच्या पंपींग व इतर व्यवस्थेची दक्षता घेण्याचे आयुक्त यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना आदेश दिले आहेत. ज्याठिकाणी गटारांवर झाकणे नाहीत किंवा गटारांवरील झाकणे त्वरीत बसवण्याचे आदेश आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहेत.

- Advertisement -

महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नालेसफाई व पावसाळी गटारे सफाईची कामे साधारणत: ९० टक्के पेक्षा जास्त पूर्ण झाली असल्याने त्याबाबत महापौर यांनी समाधान व्यक्त केले असून यावर्षीचे नालेसफाईचे काम सर्वोत्कृष्ठ झाले असल्याचे त्यांनी पाहणी दरम्यान नमुद केले आहे. यावर्षी नालेसफाईचे काम अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने केले असल्याने अतिवृष्टीच्या वेळी शहरात पाणी साचणार नसल्याचे आयुक्त यांनी नमुद केले आहे. तसेच नालेसफाई करताना पर्यावरणप्रेमी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून वैशिष्टपूर्ण नालेसफाई केल्याने पर्यावरणप्रेमी यांनी सुध्दा समाधान व्यक्त केले आहे.
शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या सूचना नुसार दिनांक ९, १० आणि ११ जून रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. त्यामुळे नागरीकांनी आवश्यक काम असेल तरच बाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये असे आवाहन महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आयुक्त दिलीप ढोले यांनी केले आहे.

हेही वाचा –

अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार; महसूलमंत्र्यांची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -