घरपालघरपोलीस अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या

पोलीस अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या

Subscribe

मुख्यालय उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची परिमंडळ-१ उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्याजागी याच परिमंडळाचे उपायुक्त जयंत बजबळे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

वसईः आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीरा- भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयातील अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्यानंतर पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. मुख्यालय उपायुक्त प्रकाश गायकवाड यांची परिमंडळ-१ उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्याजागी याच परिमंडळाचे उपायुक्त जयंत बजबळे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

मीरा रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त महेश तरडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी मुख्यालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार मराठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवघरचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांची तुळींज विभागात बदली करण्यात आली आहे. नवघऱ विभागात नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांची बदली करण्यात आली आहे. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीतून आलेल्या सहाय्यक पोलीस आयुक्त गितांजली दुधाने यांची मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -