घरपालघरवसई भूमी अभिलेख कार्यालयाची झाडाझडती

वसई भूमी अभिलेख कार्यालयाची झाडाझडती

Subscribe

तीन वर्षांपासून आवक जावक नोंदवहीवरून मोजणी अर्ज व नक्कल अर्ज, नगर भूमापन मधील फेरफार अर्ज,बारनिशी , एकत्रीकरण व आस्थापना अशा विविध दप्तर तपासणी केली.

वसईः वसई तालुका भूमी अभिलेख कार्यालया संदर्भातील असंख्य तक्रारी, कर्मचारी-अधिकारी वर्गाची मुजोरी, मनमानी- वेळकाढू कामकाज पद्धतीने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या तक्रारीची अखेर उपसंचालक भूमी अभिलेख, कोकण प्रदेश मुंबई यांनी गंभीर दखल घेतली असून तीन दिवस या कार्यालयातील दप्तरांची तपासणी करण्यात आली.कोकण प्रदेश भूमी अभिलेख उपसंचालक यांच्या कार्यालयातील टास्क फोर्सच्या पथकाने वसई तालुका भूमी अभिलेख कार्यालयात चार दिवस ठाण मांडून दप्तर तपासणी केली. उपसंचालक जयंत निकम यांनी दिलेल्या आदेशात त्यांनी नेमलेल्या पथकाने कार्यालयातील मागील तीन वर्षांपासून आवक जावक नोंदवहीवरून मोजणी अर्ज व नक्कल अर्ज, नगर भूमापन मधील फेरफार अर्ज,बारनिशी , एकत्रीकरण व आस्थापना अशा विविध दप्तर तपासणी केली.

या संपूर्ण दप्तर तपासणी कामकाजाच्या याद्या तयार करून त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा तपशीलवार अहवाल लागलीच सादर करण्याचे आदेशही उपसंचालक भूमी अभिलेख,कोकण प्रदेश मुंबई जयंत निकम यांनी दिल्यामुळे येथील मुजोर छाननी लिपीक व अन्य कर्मचारी वर्गासह खाजगी मदतनीसांनाही धक्का बसला आहे. शासनाला भरगच्च महसूल मिळवून देणारे हे अंत्यत महत्त्वाचे असे हे कार्यालय असून या कार्यालयातील मागील सहा महिन्यांपासून वसई तालूका भूमी अभिलेख उपअधीक्षक पद रिक्त आहे. याचाच गैरफायदा येथील छाननी लिपिक वजा अन्य कर्मचारी अधिकार्‍यांनी घेतला असल्याने भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. या कार्यालयाला मागील सहा महिने झाले कोणी वालीच नसल्याने याठिकाणी केवळ असंख्य तक्रारी व मनमानी कारभार सुरूच आहे,अशा तक्रारी होत्या.

- Advertisement -

पालघर जिल्हा भूमी अभिलेख उपअधीक्षक देखील या कार्यालयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने या कार्यालयात छाननी लिपीकाच्या आशिर्वादाने खासगी मदतनिसांकडून लूट सुरू आहे. स्थानिक शेतकरी, आदिवासी,सामान्य नागरिक ,व्यावसायिक कमालीचे त्रस्त आहेत. हा तपासणी अहवाल सादर झाल्यावर उपसंचालक भूमी अभिलेख, कोकण प्रदेश मुंबई यांनी नेमून दिलेल्या सहा जणांच्या पथकाकडून या कार्यालयातील दप्तर तपासणीत कोणत्या कर्मचारी अधिकारी वर्गाची कोणती कर्तव्ये व कामकाजात कोणी अनियमितता,व कसूर केला आहे यांचे बिंग फुटणार आहे.

०००

- Advertisement -

या सहा जणांच्या पथकाने तपासणी केली

विनायक हजारे (शिरस्तेदार नगर भूमापन अधिकारी, घाटकोपर) , महेश उबाळे (नगर भूमापन अधिकारी, घाटकोपर), जयेश वारघडे (शिरस्तेदार नगर भूमापन अधिकारी, गोरेगाव) ,जी. बी .कानिटकर (नगर भूमापन अधिकारी, घाटकोपर), अनिल भालेराव (शिरस्तेदार नगर भूमापन अधिकारी, उल्हासनगर) आणि रविंद्र गीते (नगर भूमापन अधिकारी, चेंबूर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -