Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर पालघर जांभूळ उत्पादकांनी कंपनी स्थापन करावी; उपजिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले

जांभूळ उत्पादकांनी कंपनी स्थापन करावी; उपजिल्हाधिकाऱ्यांनी सुचवले

कृषी विभागाच्या बहाडोलीच्या दर्जेदार जांभूळ फळाला नाव मिळवून देण्यासाठी जांभूळ उत्पादकांनी एकत्रित येऊन कंपनी स्थापन करावी.

Related Story

- Advertisement -

कृषी विभागाच्या बहाडोलीच्या दर्जेदार जांभूळ फळाला नाव मिळवून देण्यासाठी जांभूळ उत्पादकांनी एकत्रित येऊन कंपनी स्थापन करावी. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कोणत्याही प्रकारची आवश्यकता भासल्यास त्याची पूर्तता करण्यात येईल, असे आश्वासन उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी जांभूळ उत्पादकांना बहाडोली येथे दिले. बहाडोली येथे जांभूळ उत्पादक गटामार्फत जांभूळ फळ विक्रीसाठी आकर्षक पॅकिंगचे उद्घाटन नवले यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

बहाडोली येथील जांभूळ फळांची चव इतरत्र कुठेही उपलब्ध नाही. तसेच त्याचे औषधी उपयोग देखील आहेत. जांभळापासून इतर प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून बाजारामध्ये बहडोलीचे वेगळे नाव पटलावर यावे यासाठी जांभूळ फळासही भौगोलिक मानांकन प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.
– सुरेंद्र नवले, उपजिल्हाधिकारी

- Advertisement -

शेतकऱ्यांना गटामार्फत भाजीपाला फळे विक्री करण्याचा सल्ला जिल्हा कृषी अधीक्षक काशीनाथ तरकसे यांनी दिला. तर रस्त्याच्या कडेला भाजीपाला व फळे विक्री करणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना आत्माअंतर्गत विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित स्टॉलसाठी आवश्यक छत्री, क्रेट्स, ट्रे,तसेच डिजिटल वजन काटा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे, असेही तरकसे यांनी यावेळी सांगितले. नाबार्डचे अधिकारी किशोर पडघम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जांभूळ पिकाच्या भौगोलिक मानांकनासाठी आवश्यक निधी कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे.

- Advertisement -

यासाठी जांभूळ उत्पादक गटाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करावी, असेही आवाहन त्यांनी केले. या तालुका कृषी अधिकारी वैती, मंडळ कृषी अधिकारी नरगुलवार आणि शेतकरी गटाचे अध्यक्ष प्रकाश किणी व सचिव कल्पेश कडू , कृषी पर्यवेक्षक जगदीश पाटील या कार्यक्रमास उपस्थित होते. गावातील जांभूळ उत्पादक शेतकरी देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. या छोटेखानी कार्यक्रमात सुरेंद्र नवले यांनी भाजीपाला विक्रेत्यांना वजन काटा छत्री क्रेट्स व ट्रे, उपजिल्हाधिकारी नवले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

हेही वाचा –

ठाण्यात कर्करोगावरील उपचारांसाठी रुग्णालय उभारण्यास राज्य सरकारची मंजुरी

- Advertisement -