Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर पालघर सफाळ्यात ज्वेलर्सने केली ग्राहकांची फसवणूक

सफाळ्यात ज्वेलर्सने केली ग्राहकांची फसवणूक

Subscribe

याबाबत बुधवार १० मे रोजी कांद्रेभूरे येथील मनीषा धनाजी पाटील यांनी त्यांची ६.७ तोळे सोने आणि २ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सफाळे पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

सफाळे :  पालघर तालुक्यातील सफाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश ज्वेलर्स नामक सोन्या-चांदी विक्री करणार्‍या एका दुकान मालकाने ग्राहकांचे सोने व रोख रक्कम घेऊन दुकान बंद करून पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यात ३६ ग्राहकांची फसवणूक झाली असून अंदाजे ६५ तोळे सोने व २१ लाख रुपये रोख रक्कम घेऊन दुकान मालक फरार झाला आहे. याबाबत बुधवार १० मे रोजी कांद्रेभूरे येथील मनीषा धनाजी पाटील यांनी त्यांची ६.७ तोळे सोने आणि २ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सफाळे पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

सफाळे पूर्व भागातील रेल्वे फाटकासमोर कान्हाराम जलाराम चौधरी व हितेश ढोलकिया हे दोन भागीदार बारा वर्षांपासून गणेश ज्वेलर्स नामक सोने चांदी खरेदी विक्रीचे दुकान चालवत होते. सध्या सर्व ठिकाणी लग्नसराईची धामधूम सुरू असल्याचे पाहून ग्राहकांना आमीष दाखवून ग्राहकांकडून जुने सोने देऊन नवीन दागिने बनवण्यासाठी रोख रक्कम आणि दागिने दुकान मालकाने ग्राहकाकडून घेतले होते. अनेक ग्राहकांचे जुने सोने आणि रोख रक्कम गोळा करून २६ एप्रिल रोजी मालक दुकान बंद करून सर्व मुद्देमाल घेवून पळून गेला.

- Advertisement -

लग्नसराई असल्याने अनेक ग्राहक दुकानाचे हेलपाटे मारू लागले होते. मात्र, आठवडाभर सतत येऊन दुकान बंद असल्याचे पाहून आपली फसवणूक झाल्याचे ग्राहकाच्या लक्षात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. यासंदर्भात, बुधवार १० मे रोजी फसवणूक झालेल्या ग्राहक यांनी गणेश ज्वेलर्सचे मालक कान्हाराम जलाराम चौधरी व हितेश ढोलकिया यांच्या विरोधात सफाळे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. यात एकूण ३६ ग्राहकांची फसवणूक झाली असून आरोपींनी ६५ तोळे सोने आणि २१ लाख रोख रक्कम घेवून पोबारा केला आहे. याप्रकरणी सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अमोल गवळी अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -