घरपालघरमकरसंक्रांतीमध्ये हलव्याच्या दागिन्याचा साज

मकरसंक्रांतीमध्ये हलव्याच्या दागिन्याचा साज

Subscribe

हलव्याचे दागिने साखरगोळे, तीळ व साखरेच्या पाकात बनवले जातात.बाजूबंध, नथ, बांगड्या, मंगळसूत्र, टिकल्या, कानातले असे विविध हलव्याचे दागिने बनवले जातात.लहान मुलांसाठीही हार, बांगडी, बासरी, कानातलेही तयार केले जातात.

प्राची किणी,विरार : नव्या वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. जानेवारी महिना सुरू होताच, महिलांना संक्रातीच्या हळदीकुंकू समारंभाचे वेध लागलेले असते. त्यापाठोपाठ मकरसंक्रांत म्हटली की, हलव्याचे दागिने आलेच, नवीन लग्न झालेल्या वधू व लग्न ठरलेल्या मुलींना तर हे दागिने फार आवडतात. इतकंच नव्हे; तर लहान मुलांनाही हलव्याचे दागिने घालून सजवलं जातं. मकर संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांना मोठी मागणी असते. सध्या तर या दागिन्यांचा भलताच क्रेझ वाढला असून कोकणपासून मुंबई तसेच परदेशातही हे दागिने प्रसिद्ध आहेत. वसई -विरार मध्ये ही हे दागिने आता बनवले जात असून सोशल मीडियाच्या आधारे मार्केटिंग करून हे दागिने विकले जात आहेत. हलव्याचे दागिने साखरगोळे, तीळ व साखरेच्या पाकात बनवले जातात.बाजूबंध, नथ, बांगड्या, मंगळसूत्र, टिकल्या, कानातले असे विविध हलव्याचे दागिने बनवले जातात.लहान मुलांसाठीही हार, बांगडी, बासरी, कानातलेही तयार केले जातात.

नवविवाहित मुलींसाठी मकरसंक्रांत या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम संक्रांतीला नवविवाहितेला काळ्या रंगाचे वस्त्र खरेदी केले जाते. तसेच त्यांच्यासाठी हलव्याचे दागिने घालतात. त्यामुळे नवविवाहित वधू-वराकडून अशा दागिन्यांना मोठी मागणी आहे. त्याचप्रमाणे संक्रातीनंतर रथसप्तमी पर्यंतकोणत्याही दिवशी लहान मुलांचे बोर न्हाण करण्यात येते. यावेळी लहान मुलांना अनेक प्रकारच्या हलव्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. यामुळे मकर संक्रांतीमध्ये हलव्याच्या दागिन्यांचा मोठ्या प्रमाणावर साज केला जात असून सध्या मागणी वाढली आहे.जशी ग्राहकांची मागणी असते, त्या आकाराचे दागिने तयार करून त्यांना दिले जातात. विशेष करून दागिन्यांच्या सेट खरेदीकडे शहरातील नागरिकाचा कल आहे, असे व्यवसायिकांनी सांगितले आहे.

- Advertisement -

दागिन्यांचे दर
लहान मुलांसाठी – ५०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत

पुरुषांसाठी – २०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत

- Advertisement -

महिलांसाठी – ५०० रुपयांपासून २ हजार रुपयांपर्यंत

सध्या सोशल मीडियावर हलव्याच्या दागिन्याचा मोठा क्रेझ दिसून येत आहे. क्टर, इन्स्टारीलस्टार हे या दागिन्यांचा वापर करत असल्याने नागरिकांकडूनही सध्या हलव्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. हलव्याच्या दागिने बनवण्यासाठी साखर गोळे, तीळ, कॅनव्हास, धाग्याचा वापर केला जातो. ही कलाकृती करण्यासाठी जास्त वेळ लागत असून साहित्यासाठी अधिकचा खर्च होतो. त्यामुळे ह्या दागिन्यांचे दरही जास्त आहेत.

(सोनल म्हात्रे, ज्वेलरी आर्टिस्ट, विरार)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -