घर पालघर जिजाऊच्या कोकण मॅरेथॉन स्पर्धेचा विक्रमगडमध्ये उत्साह

जिजाऊच्या कोकण मॅरेथॉन स्पर्धेचा विक्रमगडमध्ये उत्साह

Subscribe

एक धाव उज्ज्वल भविष्यासाठी ही या वर्षाची या स्पर्धेची संकल्पना होती. दीड लाखांची आकर्षक बक्षिसे , सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र अशा अनेक बक्षिसांचे वितरण करत विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यात आले.

वसईः जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र राज्य व पालघर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन आयोजित निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून कोकणातील सर्वात मोठी स्पर्धा कोकण वर्षा मॅरेथॉन २०२३ ही स्पर्धा मोठ्या उत्साहात विक्रमगडमध्ये संपन्न झाली. अभिनेते शंतनू मोघे, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभली होती. कोकणातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा आठ वर्षांपूर्वी सुरु करण्यात आली होती. स्थानिक खेळाडूंना अशा प्रकारच्या स्पर्धेमधून प्रोत्साहन मिळावे , राष्ट्रीय पातळीवर इथल्या स्थानिक मातीतल्या खेळाडूंचे नाव झळकावे यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था नेहमीच प्रयत्न करत असते. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यभरातून धावपटूंना या स्पर्धेसाठी निमंत्रित केले जाते. एक धाव उज्ज्वल भविष्यासाठी ही या वर्षाची या स्पर्धेची संकल्पना होती. दीड लाखांची आकर्षक बक्षिसे , सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र अशा अनेक बक्षिसांचे वितरण करत विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यात आले.

यावेळी अभिनेता शंतनू मोघे आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी संस्थेच्या सर्व उपक्रमांना भेट देत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. निलेश सांबरे हे एक व्हिजन घेऊन आपल्या संस्थेच्या माध्यमातून कार्य करत आहेत. ज्ञानावर केलेली गुंतवणूक ही सर्वात अधिक व्याज देते. सांबरे यांचे काम ही त्याचीच पोचपावती असल्याचे म्हणत संस्थेच्या कार्याने सांबरे यांच्याबद्दल एक मानाचे स्थान आपल्या मनात निर्माण झाल्याचे सांगत पुन्हा एकदा संस्थेला भेट देण्यासाठी नक्की येईन असे शंतनू मोघे यांनी आश्वासित केले. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी देखील संस्थेच्या कार्याने आपण भारावून गेलो असल्याचे सांगितले. मी अनेक ठिकाणाहून डोनेशन घेऊन चालणार्‍या संस्था पाहिल्या. मात्र, कोणाकडून एकही रुपया न घेता चालवण्यात येणारी जिजाऊ संस्था ही एकमेव आहे. आपण देखील निलेश सांबरे यांच्या कार्याने प्रेरित झालो असून मी देखील किमान १० मुलांना तरी शिक्षणासाठी दत्तक घेईन, अशा भावना तिने यावेळी व्यक्त केल्या.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -