घरपालघरजिओ केबलचे खोदकामही रस्त्यांच्या मुळावर उठले

जिओ केबलचे खोदकामही रस्त्यांच्या मुळावर उठले

Subscribe

यामुळे आता जरी या बाबीची गंभीरता नसली तरी पावसाळ्यात मात्र या खोदलेल्या रस्त्यामुळे बर्‍याच ठिकाणी रस्ते वाहून जाण्याची शक्यता आहे. तर माती भुसभुशीत होवून वाहने फसण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

मोखाडा : मोखाडा तालुक्यातील राज्य मार्ग आणि ग्रामीण मार्गाच्या बाजुलाच होत असलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची वाताहात थांबण्याचे नाव घेत नसून आता जीओ केबलच्या खोदकामामुळे रस्त्यांची वाताहात झाल्याचे चित्र असून स्थानिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांची कसलीही परवानगी न घेता रस्त्यांच्या कडेलाच खोदल्यामुळे संबधीत ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांनी मोखाडा पोलिसांना दिले आहेत.

यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या रस्त्यावर आणि रस्त्यांच्या शेजारीच काम करून जिओ केबल खोदल्याने संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे. जीओ कंपनीचे केबल टाकण्यासाठी राजरोसपणे जेसीबीने रस्त्यांना अगदी लागूनच खोदकाम सुरू केल्या रस्त्यांची वाताहात झाली आहे. जिओची केबल खोदण्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराच्या मनमानीमुळे कसलीही परवानगी न घेता साईडपट्याही खोदण्याचे काम करण्यात येत आहे.यामुळे आता जरी या बाबीची गंभीरता नसली तरी पावसाळ्यात मात्र या खोदलेल्या रस्त्यामुळे बर्‍याच ठिकाणी रस्ते वाहून जाण्याची शक्यता आहे. तर माती भुसभुशीत होवून वाहने फसण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया
कोणीही येतो आणि रस्ते खोदतो. अशा ढिसाळ कारभारामुळे तालुक्यातील चांगल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. यामुळे विनापरवानगी अशी कामे करणार्‍यावर कारवाई व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
” याबाबत आम्ही मागे कामावर जावून काम बंदही केले होते. आमची कोणतीही परवानगी यांसदर्भांत घेतलेली नाही आम्ही संबंधितांवर गुन्हे दाखल होण्यासाठी पत्रही दिले आहे.
विशाल अहिरराव
उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -