घरपालघरमहालक्ष्मीसह जीवदानी मंदिरही उघडणार; नवरात्रौत्सवात धार्मिक कार्यक्रम होणार

महालक्ष्मीसह जीवदानी मंदिरही उघडणार; नवरात्रौत्सवात धार्मिक कार्यक्रम होणार

Subscribe

डहाणू तालुक्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेली नवसाला पावणारी महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी आईचे मंदिर आणि विरारमधील सुप्रिद्ध जीवदानी देवी माता मंदिर येत्या गुरुवारी ७ ऑक्टोबरला उघडणार असल्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

डहाणू तालुक्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेली नवसाला पावणारी महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी आईचे मंदिर आणि विरारमधील सुप्रिद्ध जीवदानी देवी माता मंदिर येत्या गुरुवारी ७ ऑक्टोबरला उघडणार असल्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्य सरकारच्या सर्व नियमांचे पालन करून भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. देशात कोरोनाने थैमान घातल्यामुळे मार्च २०२० ला संपूर्ण देशात ताळेबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळेस राज्यातील व्यावसायिक, नोकरदार, बाहेरगावी कामासाठी जाणारे कामगार यांची चांगलीच परवड झालेली पाहायला मिळाली होती. त्यांनतर काही महिन्यांनी राज्यातील काही भागातील ताळेबंदी उठवण्यात आली. मंदिर व सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे मात्र बंदच ठेवण्यात आली होती. सलग सात महिने मंदिर, प्रार्थनास्थळे बंद असल्यामुळे प्रार्थनास्थळांबाहेरील व्यावसायिक दुकानंदारांवर उपासमारीची वेळ आली होती. त्याच दरम्यान मंदिर उघडावे यासाठी अनेक आंदोलने देखील केलेली पाहायला मिळाली. राज्यात कोरोनाचा पहिल्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर दिवाळीच्या अगोदर मंदिरे उघडण्यात आल्यामुळे दुकानदारांना दिलासा मिळाला होता.

गेली कित्येक महिने आमचे कुलदैवत असलेल्या डहाणूच्या महालक्ष्मी आईचे मंदिर बंद असल्यामुळे आईच्या दर्शनासाठी मन व्याकुळ झाले होते. शासनाने मंदिर उघडण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता आईचे दर्शन घेता येणार असल्याचा आनंद होत आहे.
– कल्पेश पटेल, भाविक

- Advertisement -

त्यांनतर काही काळाने पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे ताळेबंदीचा निर्णय घेण्यात येऊन सलग ६ महिने प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आल्यामुळे दुकानदारांची पुन्हा तिच अवस्था झाली होती. दुसरी लाट ओसरती झाल्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भाकीत मांडण्यात आले होते. परंतू तिसऱ्या लाटेवर मात करण्यात बऱ्यापैकी यश मिळवता आल्यामुळे आता कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीचे नियम ठेवून प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर उघडण्यात येणार असल्यामुळे भाविक व मंदिर परीसारातील व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मंदिर व मंदिर परिसरातील दुकाने गेली कित्येक महिने बंद असल्यामुळे दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली होती.

मंदिर बंद असल्यामुळे आमची दुकाने ही बंदच होती. त्यामुळे व्यवसाय ठप्प झाला असून आमच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आता मंदिर उघडणार असल्यामुळे व्यवसाय पुन्हा सुरू होऊन सर्व काही सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे.
– योगिता वझे, दुकानदार, डहाणू

- Advertisement -

त्यांनतर आता मंदिर उघडणार म्हणून व्यापाऱ्यांनी उसणवरीने भांडवल जमा करत दुकाने सुरू करण्याची तयारी केली आहे. येत्या काळात मंदिरे उघडल्यामुळे व्यवसाय पूर्ववत होऊन उसनवारी फेडता येईल, अशी शक्यता दुकानदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. डहाणूची आदिमाया आई महालक्ष्मी आणि विरारची जीवदानी देवी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्रसोबतच गुजरातमधून लाखो भाविक महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येत असतात. तर राज्यातील लाखो भावित नवरात्रौत्सवात जीवदानी मंदिरात हजेरी लावत असतात. अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आपले श्रद्धास्थान असलेल्या देवाच्या मंदिराचे कवाड उघडणार असल्यामुळे भाविक-भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

जीवदानी माता मंदिरात सालाबादप्रमाणे सर्व धार्मिक कार्यक्रम राज्य सरकारच्या नियम आणि अटीच्या अधीन राहून केले जाणार आहेत. कोरोना नियमांचे भाविकांकडून कोणतेही उल्लंघन होऊ नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाने स्वतःहून काळजी घेतली आहे. नवरात्रौत्सवात दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावत असल्याने मेटल डिटेक्टर लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनीही कोरोना नियमांचे पालन करावे.
– पंकज ठाकूर, उपाध्यक्ष, जीवदानी मंदिर ट्रस्ट

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -