घरपालघरकौलारू घरे लुप्त होण्याच्या मार्गावर

कौलारू घरे लुप्त होण्याच्या मार्गावर

Subscribe

जंगले कमी झाली असल्याने लाकूड प्रचंड महाग

जव्हार तालुका म्हटले की घनदाट जंगले आणि डोंगरदऱ्या,नागरिकांची राहण्याची व्यवस्थादेखील वन जंगलावर आधारलेली साग किंवा शिश्वीच्या लाकडाचा वापर करून तयार केलेली मोठी आणि टुमदार घरे. परंतु आता जंगले कमी झाली असल्याने लाकूड प्रचंड महाग झाले आहे. शिवाय दरवर्षी पावसाआधी या सगळ्याच घरांची करावी लागणारी दुरुस्ती आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ ,उपयुक्त साहित्य आणि लागणारा वेळ या सगळ्या गोष्टींचा विचार करून ग्रामीण भागातील टुमदार घरांच्या जागी आता स्लॅबची घरे घेऊ लागली आहेत.

साधरण ५० वर्षापूर्वी तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक वाडी, पाडा आणि वस्तीत गवताचे छप्पर असलेली घरे मोठ्या प्रमाणावर असायची. उन्हाळ्याच्या दिवसांत या छतांची दरवर्षी दुरुस्ती करावी लागायची. त्यानंतर बारीक कौलांची मागणी वाढू लागली. जवळपास २० वर्षांपासून बारीक कौले तयार करणाऱ्या कारागिरांना आपला व्यवसाय बंद करावा लागलाच. कारण बारीक कौलांऐवजी मोठे कौले कारखान्याच्या माध्यमातून तयार होऊ लागली. या कौलांचा वापर देखील काही दिवस झाला. मात्र मोठ्या कौलाचा उपयोग करताना लाकडी फाटे,बांबू तसेच लाकूड मिळणे दिवसेंदिवस कठीण होत गेले. याला पर्याय म्हणून साध्या सिमेंट काँक्रिटची घरे बांधण्यावर भर दिला जाऊ लागला आहे.

- Advertisement -

पक्क्या घरांमुळे दरवर्षी छताच्या दुरुस्तींवर होणाऱ्या खर्चात बचत होत असल्याने नागरिक सध्या यावर जास्त प्रमाणात भर देत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सिमेंट काँक्रिटची घरे तापत असल्याने तिन्ही ऋतूत कौले व गवताच्या छताची घरे अधिक लाभदायक व आरोग्य दृष्ट्या फायदेशीर असायचे. या भागातील आदिवासी तसेच इतर नागरिकांची जीवनशैली व जीवनमान बदलल्याने आता घरांची रचना ही बदलत चालली आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही विशिष्ट प्रकारची घरे बांधली जात आहेत. फुल झाडांमुळे  घरा भोवतालचे  वातारवण चांगले राहते. याचे महत्व पटल्याने घराच्या आसपास किंवा मागील अथवा समोरील बाजूस परसबाग तयार करण्यास गृहिणी अधिक पसंती देत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -