घरपालघरसंघटीत लढा देत अधिकार अबाधित ठेवा

संघटीत लढा देत अधिकार अबाधित ठेवा

Subscribe

वसई-विरार भागातील समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी सखोल चर्चा केली आहे. आगरी समाजाबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य होते, टँकर लॉबी फोफावली होती.

वसईः केवळ आगरी समाजाच्याच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी ध्यास घेऊन प्रयत्न केला पाहिजे. भूमिपुत्रावरील अन्याय किंवा स्थानिकांच्या हक्कासाठी संघटितपणे लढा देऊन आपले अधिकार अबाधित ठेवले पाहिजे, असा सल्ला आगरी सेना संस्थापक, तथा प्रमुख राजाराम साळवी यांनी विरार येथे दिला.
आगरी सेनेच्या पालघर जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पाटील कंपाउंड, चंदनसार, विरार (पूर्व) येथे झाले. यावेळी आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी, प्रदेश उपाध्यक्ष कैलास पाटील, खासदार राजेंद्र गावीत, काँग्रेस नेते विजय पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, मनीषाताई पाटील, राहुल साळवी, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त आरोग्य सेविका सुजाता तुस्कानो, वसई- विरार पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिलराज रोकडे, ’दै.आपलं महानगर’च्या पालघर आवृत्तीचे निवासी संपादक शशी करपे, मंगेश शेलार, मोरेश्वर पाटील, अमोल अंधारे, महेश भगत, नरेश भोईर, संदेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कार्यकर्त्यांना वीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच ज्येष्ठ पत्रकार रोकडे आणि करपे यांच्यासह विश्वनाथ कुडू, सुनील घरत, विजय माने, मनोज तांबे, आशिष कदम, महेश पाटील, प्रथमेश विचारे, अब्दुल कलाम या पत्रकारांचाही पुरस्कार देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.

खासदार राजेंद्र गावित यांना सर्वसामान्यांच्या समस्यांची जाणीव असून त्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. ते कोणत्याही पक्षात असोत, त्यांना आपण वेळोवेळी मदत केली आहे आणि पुढेही करत राहू, कैलास पाटील यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व आगरी सेनेत पुढे येत असून, कार्यकर्त्यांनी त्यांचा योग्य वापर करून घ्यावा, असेही साळवी यांनी सांगितले.वसई-विरार भागातील समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी सखोल चर्चा केली आहे. आगरी समाजाबरोबर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य होते, टँकर लॉबी फोफावली होती. आज येथील पाण्याची समस्या सुटलेली आहे, यासाठी विविध पक्ष व संघटनांनी आंदोलने केली. महिलांनी मनपा प्रशासनाला धक्का दिला. आगरी सेनेच्या ज्या काही समस्या, प्रश्न आहेत, त्या सोडवण्यासाठी नेहमी सोबत आहे, असे खासदार राजेंद्र गावीत यांनी यावेळी बोलताना सांगितले. ज्यांनी खासगी जमिनी आणि सरकारी जमिनी गिळून इमारती उभारल्या व गोरगरिबांची आर्थिक फसवणूक केली, त्यांचा उदो-उदो होतो. त्याबद्दल कुणी वाचा फोडली तर त्यांचे आवाज दडपले जातात.आगरी समाजाचे कैलास पाटील धडाडीचा कार्यकर्ता आहे. समाजाला त्यांनी हुकूमशाहीतून सोडवले आहे, असे काँग्रेस नेते विजय पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -