Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर पालघर वनविभागाकडून खैराचे ओंडके जप्त

वनविभागाकडून खैराचे ओंडके जप्त

Subscribe

यामध्ये वाहन व खैराचे ओंडके असा एकूण ४५९४३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कासा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे जमा करण्यात आला आहे.

बोईसर : मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी टोल नाका येथे वनविभागाने लावलेल्या सापळ्यात खैर जातीचे मौल्यवान ओंडके जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी ट्रकचालकास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
वनविभाग डहाणू अंतर्गत कासा वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मौल्यवान लाकडांची तस्करी केली जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार १० मे रोजी चारोटी टोल नाका येथे वनविभागाने लावलेल्या सापळ्यात गुजरातकडून मुंबईकडे जाणारा ट्रक क्रमांक एम.एच.१४ एएस. ८०११ या संशयित वाहनाला थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये ६० हजार रुपये किमतीचे खैर जातीचे ४२४ सोलीव ओंडके बेकायदेशीर वाहतूक करताना आढळून आले.

यामध्ये वाहन व खैराचे ओंडके असा एकूण ४५९४३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कासा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे जमा करण्यात आला आहे.ही कारवाई उपवनसंरक्षक डहाणू मधुमिता एस,यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक उत्तम पाटील ,वनपरिक्षेत्र अधिकारी, एस.एस.कोळी वनक्षेत्रपाल कासा एन.ए.कांबळे, जी. पी.साळवी, व्ही एच चांदगुडे व वनरक्षक वाय. आर. बात्रा, एस. एस. भोये,ए.के.समारंभ पी.एल.गडग यांनी पार पाडली. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास मुरबाडचे वनपरिमंडल अधिकारी एन.ए.कांबळे हे करीत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -