घरपालघरकोचाळे जिल्हा परिषद शाळेने मिळवले आयएसओ नामांकन

कोचाळे जिल्हा परिषद शाळेने मिळवले आयएसओ नामांकन

Subscribe

ऑनलाईन शिक्षणाबरोबरच भौतिक आणि गुणात्मक निकष पूर्ण करून आपल्या शाळेला आयएसओ नामांकन मिळवले आहे.

कोरोनाने विद्यार्थ्यांना दोन वर्षाहून अधिक काळ, नियमित शिक्षणापासून दूर ठेवले. मात्र, या काळात विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणाऱ्या मोखाड्यातील, अतिदुर्गम जिल्हा परिषद शाळा कोचाळे येथील शिक्षक आणि ग्रामस्थांनी किमया घडवली आहे. ऑनलाईन शिक्षणाबरोबरच भौतिक आणि गुणात्मक निकष पूर्ण करून आपल्या शाळेला आयएसओ नामांकन मिळवले आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांच्या हस्ते त्यांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या कामगिरीचे जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या अतिदुर्गम कोचाळे येथील जिल्हा परिषद शाळेत १ ली ते ८ वीचे वर्ग असून १२८ विद्यार्थी येथे आहेत. त्यांना ४ शिक्षक ज्ञानार्जनाचे काम करतात. कोचाळे जिल्हा परिषद शाळेत आदिवासी समाजाचे विद्यार्थी आहेत. आपल्याही मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, म्हणून धडपडणारा येथील आदिवासी पालकवर्ग आणि शिक्षक आहेत. दोन वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद होत्या. परंतु या शाळेत वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण मात्र सुरु होते. कोरोना संकट नसून संधी म्हणून शिक्षक आणि ग्रामस्थांनी त्याकडे पाहिले आणि या संधीचे सोनं केले.

- Advertisement -

शिक्षकांनी ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने, आवश्यक भौतिक आणि गुणात्मक निकष पूर्ण करून, आयएसओ नामांकन प्रमाणपत्रासाठी पात्रता गाठली. सोमवारी डिसेंबरला जिल्हा परिषदेच्या सभागृहात, पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लता सानप, (माध्यमिक) संगिता भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयएसओ ९०००: २०१५ प्रामाणपत्र देऊन मुख्याध्यापक दिनकर फसाळे यांना गौरवण्यात आले आहे. शाळेचे सहशिक्षक राजाराम जोशी, गणेश वाघ, दिनेश ठोमरे आणि ग्रामस्थ कोचाळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. हे यश केंद्रप्रमुख नागु विरकर, विस्तार अधिकारी रामचंद्र विशे, गटशिक्षणाधिकारी वसंत महाले, गटविकास अधिकारी संगिता भांगरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक दिनकर फसाळे यांनी दिली आहे.

हेही वाचा – 

सोमय्यांनी माफी मागावी, अन्यथा १०० कोटी द्यावे – अनिल परब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -