घरपालघरकोरे गाव नॉट रिचेबल; कोणत्याही मोबाईल कंपनीची रेंजच नाही

कोरे गाव नॉट रिचेबल; कोणत्याही मोबाईल कंपनीची रेंजच नाही

Subscribe

दीड हजाराहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेकडील कोरे गावात कोणत्याही मोबाईल कंपनीची रेंजच येत नसल्याने गावकरी हवालदिल झाले आहेत.

दीड हजाराहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेकडील कोरे गावात कोणत्याही मोबाईल कंपनीची रेंजच येत नसल्याने गावकरी हवालदिल झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका ऑनलाइन शिक्षण घेणारे तसेच ऑनलाइन परीक्षा देणारे विद्यार्थी व वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसत असून आमचे गाव मोबाईल कंपन्यांच्या रेंजमध्ये कधी येणार, असा सवाल येथील ग्रामस्थांनी विचारला आहे. सफाळे पश्चिमेकडील कोरे हे गाव समुद्रकिनाऱ्यालगत आहे. गावची लोकसंख्या जवळपास दीड हजाराच्यावर आहे.

मुंबईपासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या या गावातील शेकडो चाकरमानी पोटा-पाण्यासाठी मुंबई तसेच पालघर व बोईसर येत-जात असतात. कोरोनाचे संकट अजून पूर्णपणे न सरल्याने अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. परंतु गावात कोणत्याही मोबाईल कंपनीची रेंज मिळत नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या सर्वांना आपले लॅपटॉप उचलून त्यांना काम करण्यासाठी गावाबाहेर जावे लागते. रात्री-अपरात्री एखादी दुर्घटना घडल्यास अथवा कुणाला निरोप द्यायचा असल्यास कोणालाही संपर्क करता येत नाही. या गावाच्या आसपास असणाऱ्या एडवण, मथाणे, वेढी, भादवे या गावात फुल रेंज मिळते. मात्र कोरे गावातच रेंज नसल्याने हे गाव नॉट रिचेबल झाले आहे.

- Advertisement -

ऑनलाईन परीक्षा कशी द्यायची सांगा?

गावात मोबाईलची रेंज मिळत नसल्याचा सर्वाधिक फटका हा ऑनलाइन शिक्षण सुरू असणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यांना रोजच्या लेक्चरसाठी लॉग इन करता येत नसल्याने अभ्यासच पूर्ण करता आलेला नाही. त्यातच आता दहावी व बारावी वगळता सर्व विद्यार्थ्यांच्या परिक्षा ऑनलाइन पद्धतीनेच होत असल्याने गावात रेंजच नाही. मोबाईलच चालणार नाही, तर परिक्षा द्यायची कशी ते सांगा, असा सवाल विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -