Eco friendly bappa Competition
घर पालघर वाडा नगरपंचायतीच्या विकास कामांमध्ये नियोजनाचा अभाव

वाडा नगरपंचायतीच्या विकास कामांमध्ये नियोजनाचा अभाव

Subscribe

तर काही ठिकाणी पावसाळ्यात या गटारांचे पाणी तुंबून शेजारच्या घरात, दुकानांमध्ये पाणी शिरुन नुकसान होणार आहे.

वाडा:  गेले वर्षभर वाडा शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. ही कामे अनेक ठिकाणी नियोजनबद्ध करण्यात आलेली नसल्याने या कामांमुळे नागरिकांना फायदा होण्या ऐवजी त्रासदायकच ठरणार असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. निकृष्ट व नियोजनाचा अभाव असलेल्या कामांबाबत स्थानिकांकडून वारंवार तक्रारी होऊनही येथील नगरपंचायत प्रशासन, पदाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांकडून आरोप केला जात आहे.
सुमारे 20 कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करून वाडा शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत. कामात नियमितता नसल्याने काही कामे चार-चार महिन्यांपासून अर्धवट राहिली आहेत. काही कामांमध्ये आवश्यक असणारी गटारे बांधली गेली नाहीत. काही कामे इतकी निकृष्ट आहेत की दोन महिन्यांतच पेवर उखडून खड्डे पडू लागले आहेत. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ठिकाणी गटारे, मोरी न बांधल्याने रहिवाशांना या सांडपाण्याच्या दुर्गंधीच त्रास होऊ लागला आहे. तर काही ठिकाणी पावसाळ्यात या गटारांचे पाणी तुंबून शेजारच्या घरात, दुकानांमध्ये पाणी शिरुन नुकसान होणार आहे.

शास्त्रीनगर या रस्त्याच्या कामाच्या अंदाजपत्रकात मोर्‍या बांधण्याच्या कामाचा समावेश नसल्याने सरसकटपणे रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले असल्याचे बेजबाबदार उत्तर संबंधित ठेकेदारांकडून स्थानिकांना दिले जात आहेत. येथील विकास कामांमध्ये प्रशासनाचे व पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष असल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे येथील रहिवासी महेश वाळुंजकर यांनी सांगितले.

- Advertisement -

जनतेच्या हितापेक्षा ठेकेदारांच्या हिताकडे येथील पदाधिकारी व प्रशासनाचे अधिक लक्ष असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
भास्कर दळवी -,अध्यक्ष, श्री साई उत्कर्ष मंडळ, शास्त्रीनगर, वाडा.

रस्त्यांची कामे अंदाजपत्रकानुसार व नियोजनबद्ध सुरु आहेत.
– सुदर्शन माकोडे , शाखा अभियंता, बांधकाम विभाग, नगरपंचायत वाडा.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -