घरपालघरवसई किल्ल्यात गेल्या पाच दिवसांपासून तोच वावर, तीच भीती...

वसई किल्ल्यात गेल्या पाच दिवसांपासून तोच वावर, तीच भीती…

Subscribe

वसई किल्ला परिसरात नागरी वस्ती आहे. किल्ल्यात वॉकींग तसेच पर्यटनासाठी येणार्‍यांची संख्याही मोठी आहे.

वसईः वसई-विरार शहरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले.मोठ्या प्रमाणात वस्त्या देखील वाढल्या.परंतु,काही गावांत आणि जुन्या किल्ल्यांसारख्या ठिकाणी सुदैवाने काही जंगल शिल्लक आहे.त्यामुळे बिबट्यासारखे प्राणी शहरांत नजरेला पडत आहेत. पाच दिवसांपूर्वी वसई किल्ल्यात आलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अद्याप यश मिळालेले नाही. त्यातच किल्ल्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात पुन्हा एकदा बिबट्या दिसून आल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वसई किल्ल्यात पाच दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी दुचाकीस्वाराला बिबट्याने धडक दिली होती. तेव्हापासून वनविभागाने बिबट्याला पकडण्याची मोहिम हाती घेतली आहे. पण, बिबट्या अद्याप हाती लागलेला नाही. त्यातच किल्ल्यातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात पुन्हा एका बिबटया किल्ल्यात फिरत असल्याचे दिसून आल्याने घबराट पसरली आहे.

वसई किल्ला परिसरात नागरी वस्ती आहे. किल्ल्यात वॉकींग तसेच पर्यटनासाठी येणार्‍यांची संख्याही मोठी आहे. पण, बिबट्या अद्यपही किल्ल्यातच असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वनविभागाने किल्ल्यात ये-जा करण्यास मनाई केली आहे. दरम्यान, किल्ल्यात मोठ्या प्रमाणावर झाडीझुडुपे असल्याने बिबट्याला लपून राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळाली आहे. आजूबाजूला घनदाट झाडे-झुडपे असल्याने झुडपांमध्ये लपून बसलेला बिबट्या दिसून येत नाही. हा परिसर वसई विरार महापालिका हद्दीत असल्याने वनविभागाने येथील झुडुपे साफ करण्याची तसेच किल्ला परिसरात दिवाबत्तीची व्यवस्था करण्याची मागणी स्थानिकांनी महापालिकेकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -