Eco friendly bappa Competition
घर पालघर पाऊस कमी, तापणार जास्त

पाऊस कमी, तापणार जास्त

Subscribe

त्याबरोबर कमाल तापमानही वाढणार असून पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. अशी माहिती कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील जिल्हा कृषि हवामान केंद्राकडून देण्यात आली आहे.

पालघर: ऑगस्टमध्ये २५ दिवसात पालघर जिल्ह्यात ५४०.१ मिमी इतका पाऊस पडणे अपेक्षित होते. पण २५ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात फक्त १५२.३ (२८.२%) मिमी इतका पाऊस पडला आहे. यापुढेही दोन आठवडे अशीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाकडून २४ ऑगस्ट रोजी प्रसारित झालेल्या विस्तारीत श्रेणी हवामान अंदाजानुसार पुन्हा २५-३१ ऑगस्ट आणि १-७ सप्टेंबर दरम्यान संपूर्ण कोकणासह पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. त्याबरोबर कमाल तापमानही वाढणार असून पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. अशी माहिती कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील जिल्हा कृषि हवामान केंद्राकडून देण्यात आली आहे.

सध्या भात पिकाची पुनर्लागवड होऊन एक महिना आसपास झाला असून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे भात शेतात विशेषतः जेथे पाणी साचून राहते अशा खोलीच्या खाचरांत कीड व रोग होण्याची शक्यता आहे. यामध्ये पानाच्या सुरळीतील अळी आणि पाने गुंडाळणारी अळी या दोन किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या दोन्ही किडींच्या प्रादुर्भावाला स्थानिक लोक बग्या रोग असे म्हणतात. जेथे कायम पाणी साचून राहते अशा शेतात दर ५० फूट अंतरावर पक्षी बसायला जागा मिळेल असे लाकडाचे छोटे छोटे मचान उभारावे. (दोन उभी लाकडे रोऊन ते दोरीने जोडावे किंवा त्यावर आडवे लाकूड बांधावे), किंवा इंग्रजी टी आकाराचे लाकुड शेतात लावावे. यावर सकाळी पक्षी बसतात आणि किडींच्या अळ्यांना खाऊन कीड नियंत्रित करण्याचे मोठे काम करतात. तसेच शेतात पाणी भरून घ्यावे व दोघांनी आडवा दोर धरून भाताची झाडे हलवित न्यावी. यामुळे पानावर लटकलेल्या अळ्या पाण्यात पडतात. हे पाणी खाचरातून बाहेर काढून टाकावे म्हणजे अळ्या शेताच्या बाहेर निघून जातील. हे करणे शक्य नसेल तर पाण्यात थोडे काळे तेल (वंगण) टाकावे. यामुळे अळी सुरळीतून बाहेर येते आणि मरते. प्रादुर्भाव जास्त दिसून येत असल्यास क्विनोलफोस २ मिली किंवा प्रोफनोफोस १ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी.

- Advertisement -

पावसाची उघडझाप आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यामुळे, भात पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तर या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २० मिली किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड १२ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.तसेच खोडकिडींच्या अंडीपुंज हे हाताने काढून टाकावे किंवा शेतामध्ये २०-२५ मीटर अंतरावर एक असे ८ गंध सापळे प्रति एकरी लावावेत, असा सल्ला कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -