Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर पालघर गुजरात निवडणुकीसाठी मुंबईतून दारु

गुजरात निवडणुकीसाठी मुंबईतून दारु

Subscribe

दारुची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून भरारी पथकाने गुरुवारी रात्री मुंबई -अहमदाबाद हायवेवरील विरारजवळील कशिद कोपर गावच्या हद्दीतील वेस्टर्न हॉटेल परिसरात सापळा रचला होता.

वसईः गुजरात राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून लक्झरी बसमधून विदेशी दारु बेकायदेशीरपणे नेली जात असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईनंतर उजेडात आला आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यावेळी दारुसह ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबईतून गुजरातला जात असलेल्या एका लक्झरी बसमधून विदेशी दारुची तस्करी होत असल्याची बातमी मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. दारुची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून भरारी पथकाने गुरुवारी रात्री मुंबई -अहमदाबाद हायवेवरील विरारजवळील कशिद कोपर गावच्या हद्दीतील वेस्टर्न हॉटेल परिसरात सापळा रचला होता.

एका टाटा कंपनीचा टेंम्पोमधून ३ इसम सिफात टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स या स्लीपर लक्झरी बसमध्ये विदेशी मद्य लपवत असताना पथकाच्या हाती लागले. पथकाने केलेल्या कारवाईत दारुचे २४ खोके जप्त करण्यात आली. त्यात २१६ विदेश मद्याच्या बाटल्या होत्या. तस्करीसाठी मद्याची लेबल बदलण्यात आली होती. याप्रकरणी टेम्पोचालक दिलीप मिश्रा (४०), मद्यसाठा पुरवणारा प्रदीप पिल्ले (४१), बस चालक अब्दुल सलाम नेदरिया (४३) ,सचिन मिश्रा (४१) आणि यासिफ खान बिहारी यांना यावेळी अटक करण्यात आली. ट्रान्सपोर्ट बसचा मालक ताहिर पलसानिया हा फरार आहे. या कारवाईत मद्यसाठा आणि वाहने मिळून एकूण ३९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -