घरपालघरमीरा -भाईंदरच्या अधिकृत फेरीवाल्यांची यादी प्रसिद्ध

मीरा -भाईंदरच्या अधिकृत फेरीवाल्यांची यादी प्रसिद्ध

Subscribe

समिती सदस्यांच्या सहकार्याने शहरात फेरीवाल्यांच्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले होते.

भाईंदर :- मीरा -भाईंदर महापालिकेच्या वतीने २०१९ साली करण्यात आलेल्या फेरीवाला प्राथमिक सर्व्हेक्षणात १३ हजार ४२७ फेरीवाले यांची नोंद करण्यात आली होती. मात्र त्यात स्थानिक व कागदपत्रे नसलेले यांना अपात्र ठरवून फेरीवाला सर्वेक्षणानुसार पात्र ठरलेल्या ८ हजार ५२८ फेरीवाल्यांची यादी महापालिका अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर आणि शहर फेरीवाला समितीच्या मान्यतेने ही अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मीरा -भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांच्या संदर्भात राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ लागू करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाने पारित केलेल्या शासन निर्णयाच्या आदेशानुसार महापालिकेने महापालिका क्षेत्रासाठी चार प्रवर्गातील ३० सदस्यांची फेरीवाला समिती गठीत करण्यात आली होती. समिती सदस्यांच्या सहकार्याने शहरात फेरीवाल्यांच्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले होते. त्याची छाननी करून महापालिकेने शहरात ८ हजार ५२८ फेरीवाले असल्याची यादी तयार करून महापालिका अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांनी शहर फेरीवाला समितीच्या मान्यतेने प्रसिद्ध केली. आता ही अंतिम यादी पथविक्रेता समिती सदस्यांसाठी निवडणूक घेण्या कामी कामगार आयुक्त यांच्याकडे सादर केली जाणार आहे. त्यानंतर जाहीर होणार्‍या फेरीवाला क्षेत्रामध्ये त्यांना समाविष्ट करून घेण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -