घरपालघरसाहित्य चावडीवर साहित्याचे अभिवाचन

साहित्य चावडीवर साहित्याचे अभिवाचन

Subscribe

सदरप्रसंगी संजना वेतुरकर , मानसी शिगवण , कुमुदिनी शाहाकार , गीताश्री नाईक , अर्चना जुवाटकर यांनी व. पुं.च्या तर प्रा. पंकज चव्हाण आणि प्रतिभा नवघरे यांनी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे अभिवाचन केले.

वसईः ’ यंग स्टार्स ट्रस्ट ’आयोजित’ साहित्य चावडी ’ तर्फे जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक कुसुमाग्रज, अण्णाभाऊ साठे,आचार्य अत्रे, व.पु. काळे आणि पु .ल. देशपांडे यांच्या साहित्याचे अभिवाचन साहित्य चावडीवर करण्यात आले. याप्रसंगी चावडीचे सरपंच म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. नारायण गिरप उपस्थित होते. सदरप्रसंगी संजना वेतुरकर , मानसी शिगवण , कुमुदिनी शाहाकार , गीताश्री नाईक , अर्चना जुवाटकर यांनी व. पुं.च्या तर प्रा. पंकज चव्हाण आणि प्रतिभा नवघरे यांनी अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचे अभिवाचन केले.

आचार्य प्र.के.अत्रे यांच्या साहित्यावर स्वाती नाईक, सुरेश घरत अभिव्यक्त झाले. सुभाष नाईक ,सुचित्रा पितळे,तृप्ती भंडारे , सुजाता टिपणीस,सीमा मिश्रा,नटवर वाघेला , हरिश्चंद्र मिठबावकर , विक्रांत केसरकर यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याचे वाचन ,गायन करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुरेखा कुरकुरे यांनी पु .ल.देशपांडे यांच्या असा मी असामी मधील उतार्‍याचे अतिशय सुंदर अभिवाचन केले. प्रा.नारायण गिरप यांनी कुसुमाग्रज, प्र.के.अत्रे,व.पु.काळे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर तराळे यांनी केले. यंग स्टार्स ट्रस्टचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर आणि सचिव अजीव पाटील यांचा पाठिंबा आणि नगरसेविका सुरेखा कुरकुरे , विक्रांत केसरकर ,मधुकर तराळे यांच्या परिश्रमाने सदर कार्यक्रम यशस्वी झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -