घरपालघरभाईंदरमधील कचरा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

भाईंदरमधील कचरा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध

Subscribe

मिरा भाईंदर महापालिकेच्या प्रभाग समिती चारमधील शाळा आणि मैदानासाठी राखीव भूखंड खासगी संस्थेला कचरा विलगीकरण करण्यासाठी देण्याचा ठराव भाजपने बहुमताच्या जोरावर संमत केला आहे.

मिरा भाईंदर महापालिकेच्या प्रभाग समिती चारमधील शाळा आणि मैदानासाठी राखीव भूखंड खासगी संस्थेला कचरा विलगीकरण करण्यासाठी देण्याचा ठराव भाजपने बहुमताच्या जोरावर संमत केला आहे. त्या कचरा प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असून शिवसेनेने त्यात उडी घेतली आहे. मिरा भाईंदर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील आरक्षण क्रमांक २१९ मध्ये शाळा व खेळाचे मैदानासाठी राखीव असतानाही त्यातील काही भाग हा एका खाजगी संस्थेला देण्याचा ठराव सत्ताधारी भाजपने नुकताच झालेल्या महासभेत बहुमताच्या जोरावर संमत करून त्याठिकाणी कचरा विलगीकरण करण्याचा प्रकल्प सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेवकांनी त्याचवेळी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता.

प्रकल्प सुरू होण्याची माहिती स्थानिकांना समजताच इंद्रलोक, रामदेव पार्क, आयडीयल पार्क या परिसरातून तीव्र विरोध केला जात आहे. हा ठराव विखंडीत करण्याची मागणी उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर आणि आकांक्षा विरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. हा भूखंड प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान यासाठी राखीव आहे. इंद्रलोक ते काशिमिरापर्यंत महापालिकेची एकही शाळा नाही. या भागामध्ये बरेच मध्यमवर्गीय नागरिक राहतात. अनेक खासगी शाळा भरमसाठ फी व शुल्क घेउन लुबाडणूक करतात, अशा पालकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महापालिकेने याठिकाणी शाळा सुरु करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. शाळा व खेळाच्या मैदानाच्या जागेत कचरा प्रकल्पासाठी फेरबदल करण्याची कायदेशीर प्रक्रियादेखील मिरा भाईंदर महापालिकेने केलेली नाही.

- Advertisement -

शाळा आरक्षणात कचरा प्रकल्प नियमबाह्य आहे. त्याचप्रमाणे प्रकल्प उभारण्यासाठी पर्यावरण विभागाची आवश्यक परवानगी घेण्यात आलेल्या नाहीत. यासाठी असणारे नियम व निकष यांची पूर्तता देखील केलेली नाही. नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून तेथील परिसर दुर्गंधीमय होऊन या प्रकल्पामुळे कायमचा त्रास रहिवाशांना होणार आहे. लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागणार आहे, असा आरोप करत नगरसेवक तारा घरत, जयंती पाटील, स्नेहा पांडे, पूजा आमगांवकर, शैलेश पांडे, आकांश विरकर यांनी विरोध केला आहे. जनतेच्या जीवाशी खेळून प्रकल्प लादण्यात आला, तर न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा विरकर यांनी दिला आहे.

हेही वाचा –

Budget 2022: अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला बुस्टर, काय केली तरतूद? जाणून घ्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -