घरपालघरमहिलांच्या समुपदेशन केंद्राच्या नावाखाली भाजपकडून लूट

महिलांच्या समुपदेशन केंद्राच्या नावाखाली भाजपकडून लूट

Subscribe
मिरा भाईंदर महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाद्वारे महिलांसाठीचे समुपदेशन केंद्र चालवण्याच्या नावाखाली लाखो रुपये भाजप सत्ताधारी आणि महिला बालकल्याण विभागातील अधिकारी लुटत असल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसच्या दिप काकडे यांनी केला आहे. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत महिलांच्या सुरक्षिततेसाठी व महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी तसेच महिलांच्या हितासाठी विविध कायद्याबाबत महिलांना माहिती करुन देण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे समुपदेशन केंद्र भाईंदर पूर्वेच्या ज्या गोडदेव परिसरात आहे. समुपदेशन केंद्र सुरू केल्यापासून सातत्याने बंद आहे. तसेच केंद्र ज्या सदनिकेत आहे. त्या सदनिकेतील अर्ध्या भागात काही भाडेकरू रहिवाशी म्हणून राहतात. त्याचे भाडे हे सदनिका धारकाला जाते. अशाप्रकारे शासनाची दिशाभूल केली जात आहे.
या केंद्राची ३ डिसेंबर २०२१ रोजी माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार या समुपदेशन केंद्रात समुपदेशन घेतलेल्या महिलांची संख्या निरंक आहे. यासाठी कोविड काळ असल्याचे कारण देण्यात आले आहे. हे केंद्र संचालनासाठी ज्या कंत्राटदाराला कार्यादेश दिला आहे. तो कार्यादेश कोविड काळात जून २०२१ या महिन्यात रद्द करण्यात आला आहे. कंत्राट रद्द केले असताना त्याचे बिल काढले जात आहे. याचा अर्थ जाणीवपूर्वक या कंत्राटदारांना, अधिकारी व सत्ताधरी भाजप नेत्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी हे केंद्र सुरू केले आहे का, असा प्रश्न दिप काकडे यांनी उपस्थित केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर बडतर्फीची कारवाई करून यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा पैसा त्यांच्या पगारातून, ग्रॅच्युटी किंवा पीएफमधून वसूल करावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -