घरपालघरलूटमार करणारे सराईत दरोडखोर गजाआड

लूटमार करणारे सराईत दरोडखोर गजाआड

Subscribe

. त्याने विरार, नालासोपारा, तुळींज, रबाळे, डोंबिवली, कळवा पोलीस ठाण्याच्या ह्ददीत दहा गुन्हे केल्याचे उजेडात आले आहे.

वसई : वसई, विरार, ठाणे, डोंबिवली परिसरात लूटमार करणार्‍या तीन सराईत दरोडेखोरांना मीरा- भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा तीनच्या पथकाने अटक केली आहे. चौकशीत तीनही आरोपीं केलेल्या बारा गुन्ह्यांची उकल झाली असून पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. १२ सप्टेंबर २०२२ रोजी नालासोपारा पूर्वेकडील कावेरी ज्वेलर्सच्या दुकानाचा दरवाजा तोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. त्याचा तपास करत असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाच्या हाती दीपकसिंग उर्फ भुशीसिंग राजूसिंग टाक (३९, रा. कामतघर, भिवंडी) हा दरोडेखोर हाती लागला. तपासात तो सराईत दरोडेखोर आणि वाहन चोरणारा असल्याचे निष्पन्न झाले. त्याने विरार, नालासोपारा, तुळींज, रबाळे, डोंबिवली, कळवा पोलीस ठाण्याच्या ह्ददीत दहा गुन्हे केल्याचे उजेडात आले आहे.

दीपकसिंग टाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात मोक्का, खून, दरोडा, घरफोडी, चोरी, वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी तीन गाड्यांसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नालासोपारा पोलीस ठाण्यातील वाहन चोरीच्या दुसर्‍या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाने फहीम अब्बास भुरे (रा. महापोली, भिवंडी) आणि दिनेश अनंता भोईर (रा. चिंचवली, वडपे, भिवंडी) या दोन जणांना अटक केली. तपासात दोघेही सराईत वाहनचोर निघाले. त्यांनी नालासोपारासह पेल्हार आणि निजामपुरा पोलीस ठाणे (ठाणे शहर) परिसरात केलेल्या गुन्ह्यांची उकल झाली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून ट्रक आणि मोटारसायकलसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -