घरपालघरमहाविकास आघाडीच्या शिष्ट मंडळाची रूग्णालयास भेट

महाविकास आघाडीच्या शिष्ट मंडळाची रूग्णालयास भेट

Subscribe

तसेच उपचाराबद्दल अनेक तक्रारी येत आहेत. या प्रकरणी जाब विचारला गेला .त्याच बरोबर पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगितले.

डहाणू: डहाणू तालुक्यातील ओसरविरा येथील 25 वर्षीय गरोदर सोनाली वाघात हिचा पोटातील बालकासह मृत्यू झाला होता. याचा जाब विचारण्यासाठी तारीख 20 रोजी डहाणू तालुक्यातील महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने कासा उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जाब विचारला. सदर महिलेच्या व बालकाच्या मृत्यूप्रकरणी कासा उपजिल्हा रुग्णालयातील नर्स व डॉक्टर यांच्या हलगर्जीपणा कारणीभूत ठरला असावा. या रुग्णालयात ग्रामीण भागातील 25 ते 30 गावातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. उपजिल्हा रुग्णालयात अनेक रुग्णांना वाईट अनुभव येत आहेत .येथील नर्स कर्मचारी,डॉक्टर उद्धटपणे बोलतात. नीट सहकार्य करीत नाहीत. तसेच उपचाराबद्दल अनेक तक्रारी येत आहेत. या प्रकरणी जाब विचारला गेला .त्याच बरोबर पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेण्यास सांगितले.

महाविकास आघाडीचे माजी समाज कल्याण सभापती काशिनाथ चौधरी यांनी यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अधीक्षक डॉक्टर सचिन वाघमारे यांना विविध समस्यांसंबंधी विचारले. नक्की ही घटना कशी घडली,अशे विचारत,त्यावेळी उपस्थित नर्स ,डॉक्टरवर कारवाईची मागणी केली. यावेळी मृत सोनाली हिचा नवरा व तिला रुग्णाला दाखल करणारी आशाताई सुद्धा बरोबर आली होती. त्यांनी सुद्धा आपले म्हणणे मांडले. कासा या मध्यवर्ती ठिकाणात असलेल्या या रुग्णालयात काही कमतरता असल्यास मदतीचे देखील आश्वासन शिष्टमंडळाने दिले. परंतु येथे येणार्‍या रुग्णांना चांगली वागणूक मिळाली पाहिजे ,बहुतेक उपचार येथेच केले पाहिजेत, अनेक रुग्णांना शेलवास वापी किंवा इतर रुग्णालयात पाठवू नये,असेही शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.याप्रसंगी अनेक पदाधिकार्‍यांनी या रुग्णालयात आपल्याला आलेले वाईट अनुभव सांगितले.

- Advertisement -

यावेळी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी , डहाणू पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी , उपसभापती पिंटू गेहला , शिवसेना संघटक प्रणय मेहेर , उपसरपंच हरेश मुकणे , पंचायत सदस्य स्वाती राऊत ,माजी सभापती स्नेहलता सातवी ,जिल्हा परिषद सदस्य लतिका बालशी, शैलेश हाडळ, नरेश कोरडा ,सरपंच वसर्विरा, सरपंच तवा लहू बाळशी , सरपंच शेणसरी साधना बोरसे ,सरपंच चिंचले कल्पना भटकरे , सरपंच चळणी सरिता भोये ,शिवसेना कार्यकर्ता जितु पटेल , ग्रामपंचायत सदस्य व अनेक आजूबाजूच्या गावातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -