Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरMaharashtra Election 2024 : विरारमध्ये विरोधात जाणाऱ्या बविआला भाजपाचा डहाणूत धक्का

Maharashtra Election 2024 : विरारमध्ये विरोधात जाणाऱ्या बविआला भाजपाचा डहाणूत धक्का

Subscribe

विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी विरारमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. एकीकडे बहुजन विकास आघाडीने पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून घेरलेले असतानाच दुसरीकडे भाजपाने डहाणूत बविआला मोठा धक्का दिला आहे.

डहाणू : भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी विरारच्या विवांता हॉटेलमध्ये बसून पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी पक्षाकडून करण्यात आला. बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तावडे यांना रंगेहाथ पकडले. मंगळवारी (ता. 19 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजता सुरू झालेला हा राडा साधारणतः 03 वाजेपर्यंत सुरू होता. यावेळी बविआच्या पदाधिकाऱ्यांनी विनोद तावडे यांना घेराव घालत हॉटेलमध्येच धरून ठेवले. विरारमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडीची राज्यभर चर्चा सुरू आहे. विनोद तावडे नेमके विरारमधील या हॉटेलमध्ये कशासाठी आले होते? याबाबतची होणारी पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने होऊ दिली नाही. पण एकीकडे ही घटना घडत असतानाच दुसरीकडे डहाणूमध्ये बविआच्या उमेदवाराने भाजपात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Election 2024 Bahujan Vikas Aghadi which was going against in Virar, was given shock by BJP in Dahanu Assembly)

राज्यभरात बुधवारी (ता. 20 नोव्हेंबर) 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पण त्याआधीच बहुजन विकास आघाडीचे डहाणूतील उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. सुरेश पाडवी यांनी मतदानाच्या एक दिवस आधी भाजपात प्रवेश करत या पक्षातील महायुतीचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पाडवी यांनी मतदानाच्या एक दिवस आधीच माघार घेतली आणि भाजपाला पाठिंबा दिला आहे. सुरेश पाडवी यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये पुन्हा घरवापसी केली. त्यामुळे डहाणू विधानसभेत बहुजन विकास आघाडीला खिंडार पडले आहे. यामुळे बविआला मोठा धक्क बसला असून बविआने विरारमध्ये जरी भाजपाच्या राष्ट्रीय नेत्याला घेराव घातलेला असला तरी भाजपाने बविआला डहाणूत मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Vinod Tawde : पैसे वाटल्याचा आरोप, तीन तास राडा; अखेर विनोद तावडे मोजक्या वाक्यात बोलले अन् हात जोडून निघून गेले

काय घडले विरारमध्ये?

विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वमधीलल विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपाचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरू होती. त्यावेळी बविआचे काही कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले. बविआच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी पैसेवाटप सुरू असल्याचा आरोप केला आणि राडा घातला. या राड्यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी क्षितिज ठाकूरही घटनास्थळी उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. तर पोलिसांना हॉटेलच्या एका खोलीतून लाखो रुपयांची रक्कम जप्त केली तर तावडेंकडे सापडलेल्या डायऱ्यांमध्ये 15 कोटींचा उल्लेख असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -