(Maharashtra Election 2024) वसई : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना मंगळवारी नालासोपाऱ्याच्या एका हॉटेलमध्ये कथितरीत्या पैसे वाटप करताना पकडण्यात आले होते. त्यावरून बहुजन विकास आघाडीचे प्रमुख, आमदार हितेंद्र ठाकूर आक्रमक झाले आहेत. ‘दिखेंगे तो पिटेगे’ असे म्हणत, मतदारसंघात असे करताना कोणी दिसले तर त्यांना फटकावणार असल्याचा इशारा हितेंद्र ठाकूर यांनी दिला आहे. (Hitendra Thakur’s warning on Vinod Tawde money distribution case)
मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी विनोद तावडे यांनी विरारमध्ये येऊन पैसे वाटल्याचा आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला. बविआच्या कार्यकर्त्यांनीच विनोद तावडे यांना विरार पूर्वेतील विवा हॉटेलमध्ये पैसे वाटप करताना पकडल्याचे सांगण्यात येते. तावडे यांना तब्बल साडेचार तास बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरले होते. या प्रकरणामध्ये तावडे यांच्यासह भाजपाच्या 36 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पैशांचे वाटप करून मतदारांना लाच दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – Jayant Patil : … पण महाराष्ट्र विकला जाणार नाही; जयंत पाटलांचा विरोधकांवर हल्लाबोल
त्यानंतर, मुंबईत आल्यावर माध्यमांशी संवाद साधताना विनोद तावडे यांनी, पैशाचे सर्व आरोप खोटे असून त्याबाबत एकही गुन्हा दाखल झालेला नाही, असे सांगतानाच, बहुजन विकास आघाडीवर आरोप केले. हॉटेलमध्ये सापडलेले पैसे भाजपाचे नव्हते, या उलट ते हॉटेल ठाकूर यांच्या मालकीचे होते, असा आरोप तावडे यानी केला आहे. त्यावर, हॉटेल माझ्या मालकीचे होते तर, भाजपाने ते का बुक केले? विनोद तावडे यांनी ते हॉटेल माझ्या नावावर करावे, असा टोला हितेंद्र ठाकूर यांनी लगावला.
भाजपाचा राष्ट्रीय स्तरावरील एक नेता पैसे वाटत असल्यावर माझा विश्वास बसत नाही. काल, मंगळवारी विनोद तावडे नालासोपाऱ्यात भिजलेल्या कोंबडीसारखे बसले होते, त्यावेळी मला त्यांचे सारखे फोन येत होते. नंतर मुंबईला गेल्यावर त्यांना कंठ फुटला. खोटे बोला पण रेटून बोला ही भाजपाची प्रवृत्ती असल्याचा पलटवार आमदार ठाकूर यांनी केला. (Maharashtra Election 2024 : Hitendra Thakur’s warning on Vinod Tawde money distribution case)
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : विनोद तावडेंना मिळालेली वागणूक…; राणेंकडून संताप व्यक्त