विरार : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान बुधवारी पार पडले. शनिवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरुवात होणार आहे. या मोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या सहा विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडले. शनिवारी सकाळी या मतमोजणी होणार असून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. नालासोपारा विधानसभा मतमोजणी केंद्रावर पाहिले पोस्टल मतमोजणी सुरू होणार आहे. यामध्ये एकूण २८ टेबल वर १९ फेर्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. तर वसई विधानसभा मतमोजणी केंद्रावर पहिले पोस्टल मतमोजणी सुरू होणार आहे. यामध्ये एकूण १४ टेबलवर २५ फेर्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सध्या मतदान यंत्रे ही प्रत्येक मतदार संघात तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरूममध्ये चोख बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे आता निकाल काय लागणार ? या कडे सर्वांचे लक्ष आहे.
कुठे पाहता येणार निवडणुकांचे निकाल ?
निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी तयारी पूर्ण केली आहे. तब्बल ६ मतदार संघांचे निकाल हे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपडेट केले जाणार आहे. त्यामुळे निकालाची अधिकृत आकडेवारी ही निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर पाहता येणार आहे,
नालासोपारा विधानसभेत झालेले मतदान
एकूण मतदान 6 लाख 08 हजार 526
झालेले मतदान :- 3 लाख 49 हजार 110
महिला 1लाख 62 हजार 093
पुरुष 1लाख 86 हजार 979
तृतीय पंथी 38
वसई विधानसभेत झालेले मतदान
एकूण मतदान:-3 लाख 54 हजार 652
झालेले मतदान :- 2 लाख 18 हजार 058
महिला 1लाख 06 हजार 393
पुरुष 1 लाख 11 हजार 663
तृतीयपंथी 2