Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरMaharashtra Election: ’स्वीप’च्या उपक्रमांचा मतदान टक्केवारी वाढविण्यात सहभाग

Maharashtra Election: ’स्वीप’च्या उपक्रमांचा मतदान टक्केवारी वाढविण्यात सहभाग

Subscribe

 माझे मत माझे भवितव्य हा संदेश घरोघरी पोहचवून स्वीप टीममार्फत मतदान जनजागृती करुन पालघर जिल्हा वासियांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले.

जव्हार: पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या संकल्पनेतून पालघर जिल्हात मागील मतदान टक्क्यांपेक्षा अधिक मतदान वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.  जिल्हा निवडणूक अधिकारी विधानसभा निवडणुकीमधील पालघर जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी विजया जाधव आणि त्यांच्या समितीने  मतदानाची टक्केवारी वाढण्याकरिता राबवलेल्या नाविन्यपूर्ण विविध उपक्रमांची मतदारांनी दखल घेतली. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात मतदान टक्केवारी ७.७१% ने वधारली आहे. विधानमंडप, मतदारनगरी, ई-मतदार शपथ, व्ही. आर. बॉक्स, गुगल असिस्टंट डिव्हाइस आदी तंत्रज्ञानाचा वापर, कडधान्यांच्या रांगोळ्या तसेच भारत निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन व सिनेअभिनेते राजकुमार राव, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर, युट्यूबर रंजिता पाटील, तारपा वादक भिकल्या धिंडा यांचे व्हिडिओ संदेश, स्प्रेड इट व पालघर स्टोरीजचे मतदार जनजागृतीपर “रिल / व्हिडिओ, तालुकास्तरीय विविध स्वीप कक्षांचे उपक्रम यासह पोस्टर्स, जिंगल्स, छायाचित्रे, लोगो, रिंगटोन आदी नावीन्यपूर्ण बाबी या विविध कार्यालयांच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, वेबसाईट, यूट्यूब आदी माध्यमांवर प्रसारित करण्यात आल्या.
माझे मत माझे भवितव्य हा संदेश घरोघरी पोहचवून स्वीप टीममार्फत मतदान जनजागृती करुन पालघर जिल्हा वासियांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले. मागील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये पालघर जिल्ह्याची सरासरी मतदान ५८.९२% झालेले होते. तरी स्वीप कार्यक्रमांतर्गत केलेल्या प्रचार, प्रसिध्दीमुळे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये पालघर जिल्ह्याचे सरासरी मतदान ६६.६३% इतके झालेले आहे. यामध्ये सरासरी ७.७१ % मतदान टक्केवारी वाढली असून स्वीपअंतर्गत केलेल्या मतदान जनजागृतीस पालघरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

विधानसभा.         २०१९.       २०२४
१२८ डहाणू.        ६०.६९.       ७३.३४
१२९ विक्रमगड.     ६८.५८.      ७७.९५
१३० पालघर.       ४७.११.       ७१.५८
१३१ बोईसर.        ६७.५७.       ६७.५०
१३२ नालासोपारा.  ५१.८१.       ५७.३७
१३३ वसई.             ६२.४३.       ६१.४९
एकूण.                  ५८.९२.          ६६.६३

- Advertisement -

प्रतिक्रिया

पालघर जिल्ह्यात सागरी, डोंगरी आणि नागरी असा भूभाग आहे. येथील मतदारांना मतदानाचे महत्त्व लक्षात यावे यासाठी सहाही विधानसभा क्षेत्रात स्वीप उपक्रमांतर्गत चांगले काम झाले. त्यामुळे मतदान टक्केवारी निश्चित वाढली.

- Advertisement -

–  इमरान कोतवाल, उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -