Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरMaharashtra Elections 2024: मीरा -भाईंदरमध्ये ५ वाजेपर्यंत ४८.३६ टक्के मतदान

Maharashtra Elections 2024: मीरा -भाईंदरमध्ये ५ वाजेपर्यंत ४८.३६ टक्के मतदान

Subscribe

सकाळी ११ वाजेपर्यंत १८.२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर २९.९५ टक्के मतदान दुपारी एक वाजेपर्यंत मतदान झाले होते. त्यानंतर तीन वाजेपर्यंत ३९.१० टक्के मतदान झाले आणि ५ वाजेपर्यंत ४८.३६ टक्के मतदान झाले होते.

भाईंदर : मीरा- भाईंदर १४५ विधानसभा मतदारसंघात गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ४९ टक्के मतदान झाले होते. मात्र त्यामध्ये आणखी वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलल्यामुळे यावेळी मतदानात वाढ झाली आहे. मतदान करण्यासाठी सकाळी ७ पासून मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्याने मतदारांमध्ये ऊत्साह दिसून आला. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला आहे. मीरा -भाईंदर विधानसभा मतदारसंघात आज झालेल्या निवडणुकीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.३६ टक्के मतदान झाले आहे.मीरा- भाईंदर विधानसभा मतदारसंघात पुरुष २ लाख ६७ हजार ७८५, महिला २ लाख ४३ हजार ७२ आणि इतर ५ असे एकूण ५ लाख १० हजार ८६२ मतदार आहेत. मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साह वाटत होता. काही भागात सकाळपासून गर्दी होती. तर काही भागात सकाळी ९ नंतर गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ७.२१ टक्के मतदान झाले होते. सकाळी ११ वाजेपर्यंत १८.२ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर २९.९५ टक्के मतदान दुपारी एक वाजेपर्यंत मतदान झाले होते. त्यानंतर तीन वाजेपर्यंत ३९.१० टक्के मतदान झाले आणि ५ वाजेपर्यंत ४८.३६ टक्के मतदान झाले होते.

पोलिसांच्या मध्यस्थी नंतर शांतता

- Advertisement -

मीरा -भाईंदरमध्ये मतदानाच्याच दिवशी दुपारी भाईंदर पश्चिमेच्या बावन जिनालय जैन मंदिर येथे खुद्द भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे कार्यकर्ते नारायण नांबियार यांच्यात बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी सदर ठिकाणी हस्तक्षेप करत पुन्हा शांतता प्रस्थापित केली, त्यानंतर मीरा-भाईंदर मध्ये कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. तसेच मतदान प्रक्रियेत ईव्हीएम मशीन बंद पडणे किंवा मतदान मशीन खराब होणे तसेच मशीन हळू चालणे असा प्रकार झाला नाही. मीरा -भाईंदर शहरात सकाळ पासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर शहरात सर्वत्र मतदान शांततेत चालले होते स्वतः पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे , गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि मिरा भाईंदर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड हे शहरात फिरून मतदान केंद्रांना भेटी देत होते.

 

- Advertisement -

प्रथमच मतदान करत असल्यामुळे उत्साह वाटत होता. प्रथमच मतदान प्रक्रिया पाहिल्याने व मतदान केल्यामुळे आनंद वाटला. मतदानाला गेल्यानंतर मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. गर्दीमध्ये दीड तास लागल्यामुळे कंटाळा आला. तरुण पिढीला गर्दीत उभे राहणे आवडत नसल्यामुळे यामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे.

– प्रथमेश कामडी, प्रथम मतदान


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -