Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरMaharashtra Elections 2024: ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी अभेद्य सुरक्षा कवच

Maharashtra Elections 2024: ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी अभेद्य सुरक्षा कवच

Subscribe

त्यासोबतच ज्याठिकाणी मशीन आहेत, त्याठिकाणी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याचे थेट प्रक्षेपण बाहेर उमेदवारांचे प्रतिनिधी आणि पोलिसांना पाहायला ठेवण्यात आले आहे.

भाईंदर : मीरा -भाईंदर १४५ विधानसभा मतदार संघाची मतदानाची रणधुमाळी संपल्यानंतर आता प्रतीक्षा राहिली ती निकाल जाहीर होण्याची. त्यासाठी निवडणूक आयोगाने भाईंदर पूर्वेला इंद्रलोक परिसरात स्व. प्रमोद महाजन सभागृह येथे स्ट्राँगरूम बनवली असून त्यात मतदान प्रक्रिया झाल्यानंतर ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन ठेवलेल्या आहेत. त्या स्ट्राँग रूमच्या बाहेरचा संपूर्ण ताबा हा केंद्रीय राखीव पोलीस दल पोलिसांनी घेतला आहे. त्यानंतर येणार्‍या- जाणार्‍या ठिकाणी स्ट्राँगगार्ड पथक, गुजरात सशस्त्र पोलीस दल आणि त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचे कवच आहे. मतमोजणीसाठी 80 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणि 30 सीआरपीएफचे जवान तैनातअसणार आहेत. त्यासोबतच ज्याठिकाणी मशीन आहेत, त्याठिकाणी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याचे थेट प्रक्षेपण बाहेर उमेदवारांचे प्रतिनिधी आणि पोलिसांना पाहायला ठेवण्यात आले आहे.

ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन ज्याठिकाणी ठेवल्या आहेत, त्यात ठिकाणी तीन लेयरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात सुरक्षा लावण्यात आली आहे. त्यासह ईव्हीएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी चारही बाजूंनी तिसर्‍या डोळ्याची नजर आहे. मीरा -भाईंदर मतदारसंघाची मतमोजणी ही स्व. प्रमोद महाजन सभागृह, इंद्रलोक भाईंदर पूर्व केंद्रांवर होणार आहे. तसेच २३ सप्टेंबर रोजी शनिवारी कशी मतमोजणी करायची आहे, यासाठी शुक्रवारी खास प्रशिक्षण अधिकारी आणि कर्मचार्‍यांना देण्यात येणार आहे. तसेच त्याठिकाणी मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट यांना बंदी असणार आहे. स्ट्राँगरूमच्या सुरक्षेसाठी ७५ च्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मतमोजणीसाठी २१ टेबल असणार आहेत व ३ टेबल हे टपाली मतदानासाठी (पोस्टल बॅलेट) असणार असून एकूण २४ फेर्‍या होणार आहेत. स्ट्राँगगार्ड पथक बंदुकधारी गुजरात पोलिसांचे कवच आहे, त्यानंतर महाराष्ट्र पोलीस आहेत.

- Advertisement -

१४५ मीरा – भाईंदर विधानसभा मतदार संघात एकूण ५ लाख १० हजार ८६२ मतदार असून त्यात पुरुष मतदार २ लाख ६७ हजार ७८५ आणि महिला मतदार २ लाख ४३ हजार ७२ आणि इतर ५ असे आहेत. त्यापैकी काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलेल्या मतदारांमध्ये १ लाख ३७ हजार ९२८ पुरुष मतदार आणि १ लाख २६ हजार ४२६ महिला मतदारांनी मतदान केले आहे. असे एकूण २ लाख ६४ हजार ३५४ एवढे मतदान झाले आहे. त्याची एकूण टक्केवारी ५१.७५ टक्के एवढी झाली आहे.


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -