वसई: पूर्वापार प्रचलित प्रचाराच्या पद्धती मागे पडून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून यावेळीचा प्रचार झाल्याचे समोर आले आहे. आता सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम झाले असून यंदा राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा पुरेपूर वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. यात दोन उमेदवारांचे समर्थक यांच्यातील डिजिटल प्रचारात मोठी रंगत निर्माण झाली आहे. दावे प्रतिदावे केलेली विकासकामे, निवडून आलो तर करणार असलेली कामे आणि आता सत्तेत होतात तर परिसराची का नाही केली विकासकामे या संदर्भातील मेसेज समर्थकांकडून सोशल मीडियाच्या फेसबुक, इन्स्ट्राग्राम वर पोस्ट केली जात आहेत. यात प्रत्येक उमेदवाराची एक स्वतःची वॉर रुम कार्यरत करण्यात आली आहे. यामुळे नेहमीप्रमाणे पोस्टर, बॅनरबाजी, रॅली, प्रत्यक्ष गाठीभेटी, रिक्षा, टेम्पोला कर्णे लावून करण्यात येणार्या प्रचारात सोशल मीडिया वरचढ ठरत आहे. प्रचारात, माहिती देण्यात आणि घेण्यात, घटना समजण्यात सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी ठरले आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने आणि त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडियाचा वापर करून प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे.
Maharashtra Elections 2024: यावेळीच्या प्रचारात सोशल मीडिया ठरला प्रभावी
written By My Mahanagar Team
vasai
प्रचारात, माहिती देण्यात आणि घेण्यात, घटना समजण्यात सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी ठरले आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने आणि त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडियाचा वापर करून प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -