घरपालघरमहावितरणचा वीज चोरांना शॉक,एकाच दिवशी 190 वीज जणांवर कारवाई

महावितरणचा वीज चोरांना शॉक,एकाच दिवशी 190 वीज जणांवर कारवाई

Subscribe

मुख्य अभियंता धनंजय औढेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन महिन्यांपासून व्यापक कारवाईच्या माध्यमातून कल्याण परिमंडलात वीज चोरट्यांविरुद्ध मोर्चा उघडण्यात आला आहे. ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार अचूक वीज बिल मिळावे, हा उद्देशही या शोध मोहिमेमागे आहे.

वसई : महावितरणच्या वसई मंडलातील विरार विभागात सोमवारी एकाच दिवशी व्यापक शोध मोहीम राबवून तब्बल 190 वीज चोरट्यांना कारवाईचा दणका देण्यात आला. 430 कर्मचार्‍यांच्या 60 विशेष पथकांनी दोन हजार 300 ग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी करून ही कारवाई केली. मुख्य अभियंता धनंजय औढेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन महिन्यांपासून व्यापक कारवाईच्या माध्यमातून कल्याण परिमंडलात वीज चोरट्यांविरुद्ध मोर्चा उघडण्यात आला आहे. ग्राहकांना त्यांच्या वीज वापरानुसार अचूक वीज बिल मिळावे, हा उद्देशही या शोध मोहिमेमागे आहे.

अधिक वीजहानी असलेल्या वीज वाहिन्यांवर गेल्या दोन महिन्यांपासून वीज चोरांविरुद्ध व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार विरार विभागातील अधिक हानी असलेल्या संतोष भवन या वीज वाहिनीवरील संतोष भवन, बिलालपाडा, वलईपाडा, हवाईपाडा, डोंगरपाडा, गौराईनाका, भावशेठपाडा, शर्मावाडी, कारगील नगर या परिसरात 430 कर्मचार्‍यांच्या 60 विशेष पथकांनी एकूण 2 हजार 300 वीज जोडण्यांची तपासणी केली. यात वीज कायदा 2003 च्या कलम 135 प्रमाणे 190 ठिकाणी वीज चोरी होत असल्याचे तर 175 ठिकाणी विजेचा अनधिकृत वीज वापर सुरू असल्याचे आढळले.

- Advertisement -

त्याच दिवशी उल्हासनगर विभाग दोन अंतर्गत अधिक वीजहानी असलेल्या श्रीराम वीज वाहिनीवर शोध मोहीम राबवून 12 वीज चोरांना कारवाईचा शॉक देण्यात आला. वीज चोरी आढळलेल्या ठिकाणी चोरीच्या विजेचे अनुमानित देयक व तडजोडीची रक्कम भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या रकमेचा मुदतीत भरणा न करणार्‍यांविरुद्ध कलम 135 नुसार गुन्हा दाखल होण्यासाठी पोलिसात फिर्याद देण्यात येईल. प्रामाणिक ग्राहकांच्या सुविधेसाठी राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेला अटकाव न करता सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -