Eco friendly bappa Competition
घर पालघर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा

Subscribe

१५ ते २९ वर्षांपूर्वी अशाच गायीपैकी काही गायी गणेशोत्सव मंडपात घुसल्यामुळे मोठा कठीण प्रसंग उद्भवला होता, याकडे चोरघे यांनी महापालिकेचे लक्ष वेधले आहे.

वसईः वसई -विरार परिसरात दूध काढून मालक गुरेढोरे रस्त्यावर सोडून देत असतात. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा होत असतो. तसेच मलमुत्रही रस्त्यावरच करत असल्याने त्याचाही त्रास शहरवासियांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी माजी नगरसेवक विलासबंधू चोरघे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

मोकाट गुरेढोरे विशेषतः गायींना मालक दूध काढून झाल्यावर रस्त्यावर सोडून देत असल्याने रोडवर मोकाट जनावरे फिरत असतात. रस्त्यावरच बसून ट्राफिक जाम करतात. मलमूत्र रस्त्यावरच होते. त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना त्रास होतो आणि उकिरड्यावरील प्लास्टिक वेष्टनातील अन्न खाल्याने गायींनाही त्रास होतो. १५ ते २९ वर्षांपूर्वी अशाच गायीपैकी काही गायी गणेशोत्सव मंडपात घुसल्यामुळे मोठा कठीण प्रसंग उद्भवला होता, याकडे चोरघे यांनी महापालिकेचे लक्ष वेधले आहे.

- Advertisement -

 

भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची गरज

- Advertisement -

तसाच प्रकार भटक्या श्वानांच्या बाबतीतही आहे. भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. तसेच उंदीर घुशींनाही पकडण्यासाठी मुंबई महापालिकेप्रमाणे मोहीम राबवावी. या विषयावर गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे कारण खाद्यपदार्थ उदा. हॉटेल्स असणार्‍या इमारती, अस्वच्छ व खिडकीतून उरलेले अन्न टाकणार्‍या इमारती व अन्नधान्याची गोडाऊन असलेल्या इमारतीच्या आवारात उंदीर -घुशींनी बिळे तयार केल्याने इमारती कमकुवत झाल्या आहेत. दहा वर्षांपूर्वी गणेशोत्सव मंडपातील समईतील पेटती वात उंदराने पळवली होती. परंतु, होणारा मोठा प्रसंग टळला होता. त्यामुळे हा विषयही गंभीरपणे हाताळावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

- Advertisment -